Join us
Daily Top 2Weekly Top 5

... अन् मैदानातील पंच थेट धावतच सुटले; पाहा वायरल झालेला भन्नाट व्हिडीओ

इथे तर चक्क पंच एक गोष्ट विरसल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 13:31 IST

Open in App

मुंबई : मैदानात बऱ्याच रंजक गोष्टी पाहायला मिळतात. पण ही गोष्ट तर चक्क मैदानातील पंचांच्या बाबतीत घडायला मिळाली आहे. मैदानातील पंच थेट धावतच सुटल्याचे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे.

मैदानात काही वेळा खेळाडू काही गोष्टी विसरतात किंवा त्यांनी काही गोष्टींचा विसर पडलेला पाहायला मिळतो. काही वेळा मैदानात तणावपूर्ण स्थिती निर्माणही होते, पण ते विसरवण्यासाठी काही जणं थोडीशी मजा-मस्ती करतात. पण इथे तर चक्क पंच एक गोष्ट विरसल्याचे पाहायला मिळाले आहे.

या व्हिडीओमध्ये पंच एका टोकाकडून दुसरीकडे धावताना तुम्ही पाहिले असेल. हे पाकिस्तानचे पंच अलीम दार आहेत. ही गोष्ट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात घडल्याचे पाहायला मिळाले. पंच अलीम दार हे स्क्वेअर लेगला उभे असल्याचे साऱ्यानी पाहिले. पण त्यांना पॉइंटच्या ठिकाणी उभे राहायचे होते. कारण पॉइंटच्या ठिकाणावरून सर्व स्पष्ट दिसते. पण तिथे जायला अलीम दार विसरले. पण कालांतराने ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे ते पॉइंटच्या दिशेने धावत सुटले. ते धावत असताना त्यांच्या चेहऱ्यावर मस्त भाव होते. हसत-हसत त्यांनी पॉइंटपर्यंतचा मार्ग गाठला. अलीम दार धावत असताना चाहत्यांनी टाळ्या वाजवल्याचेही पाहायला मिळाले. 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियान्यूझीलंड