- सौरव गांगुलीभारत-श्रीलंका सामने आता क्रिकेटरसिकांसाठी कंटाळवाणे ठरत आहेत. २०१५ च्या गॉल कसोटीपासून उभय संघांतील चुरस कमी कमी व्हायला लागली. सध्या तर लंकेचे खेळाडू नांगी टाकतानाच दिसत आहेत. कसोटी सामन्यात दोन संघ परस्परांपुढे असतील तर कुठलाही एक संघ बाजी मारणार, हे खरे आहे. पण, एखादा संघ प्रतिकारच करीत नसेल तर खेळातील आव्हान आणि स्पर्धात्मक वातावरण आपोआप नाहीसे होते. कोलकाता येथे श्रीलंकेला पावसाने तारले, हे त्यांचे सुदैव म्हणावे लागेल. त्याआधी, भारताने त्यांच्यावर ओळीने नऊ विजय साजरे केले. नागपुरात पुन्हा एकदा भारताने मिळविलेल्या विजयात अजिबात चुरस जाणवली नाही.भारतीय उपखंडाबाहेर लंका संघ खेळत असेल आणि पराभूत होत असेल तर एकदाचे समजू शकतो. पण आयुष्यभर त्याच त्या वातावरणात खेळल्यानंतरही तुम्हाला एकरूप होता येत नसेल तर याला काय म्हणावे. लंकेचा संघ नवखा आहे, अशी सबब दिली जाते. तरीही खेळाडूंमधील संघर्ष आणि निर्धार संपलेला दिसला. श्रीलंकेचे खेळाडू तर चेंडू वळण घेणाºया खेळपट्ट्यांबद्दल चांगलेच अनुभवी बनले आहेत. भारताने मागे लंकेचा दौरा केला त्या वेळी विराटला नाणेफेक जिंकण्यात यश कदाचितच आले होते. तेव्हादेखील लंकेला कसोटीच्या चौथ्या दिवशी पराभव वाचविण्यासाठी धडपडावे लागले. तुम्ही नाणेफेक जिंकत असाल आणि पाटा खेळपट्टीवर २०० धावांत बाद होत असाल तर तुम्हाला कुणीही माफ करणार नाही. लंकेचा मारा फारच कुचकामी असताना ईडनने त्यांना गडी बाद करण्याची संधी दिली. तरीही वेगवान माºयात दम नव्हता आणि फिरकी मारा दिग्गज फलंदाजांपुढे निष्प्रभ ठरला. तब्बल चार जणांनी शतके ठोकली. विराटचा धडाका कायम आहे. धावांचा पाऊस पाडून विराट क्रिकेटजगताचा मानबिंदू बनला. हा फॉर्म पुढील १५ महिने कायम असेल, अशी आशा बाळगतो. भारतीय क्रिकेटसाठी त्याची खेळी मोलाची ठरावी. आश्विनने ३०० बळींचा टप्पा गाठला. पुढील १० वर्षे त्याची बळींची भूक थांबू नये, असे वाटते. दिल्लीतील तिसरा कसोटी सामना महत्त्वपूर्ण ठरेल. भारताच्या विजयात हवामानाचा अडसर येऊ नये, इतकेच. लंकेचे खेळाडू खवळून जागे न झाल्यास तिसरी कसोटीदेखील वेळेआधीच संपेल, असे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते. लंकेचा उत्कृष्ट गोलंदाज मानला जाणारा रंगाना हेरथ खेळणार नाही. अशा स्थितीत लंकेचा संघ भारताचे २० फलंदाज कसा बाद करेल, हे माझ्यासाठी कोडे आहे. दुसºयांदा रंगाना भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान जखमी होऊन बाहेर पडला, हे विशेष. (गेमप्लान)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ...तर तिसरी कसोटीही वेळेआधीच संपेल
...तर तिसरी कसोटीही वेळेआधीच संपेल
भारत-श्रीलंका सामने आता क्रिकेटरसिकांसाठी कंटाळवाणे ठरत आहेत. २०१५ च्या गॉल कसोटीपासून उभय संघांतील चुरस कमी कमी व्हायला लागली. सध्या तर लंकेचे खेळाडू नांगी टाकतानाच दिसत आहेत. कसोटी सामन्यात दोन संघ परस्परांपुढे असतील तर कुठलाही एक संघ बाजी मारणार, हे खरे आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:11 IST