Join us

...अन् इतिहासाची पुनरावृत्ती झाली

इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होते. क्रिकेटही त्याला अपवाद नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:33 IST

Open in App

नवी दिल्ली: इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होते. क्रिकेटही त्याला अपवाद नाही. १६ वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणला २००३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाकारण्यात आले तीच वेळ हैदराबादचा दुसरा फलंदाज अंबाती रायुडू याच्यावर २०१९ मध्ये आली आहे.तिसऱ्या स्थानावरील फलंदाज लक्ष्मणचे २००३ मध्ये संघात स्थान जवळपास नक्की झाले होते. संघ निवडीच्या काही दिवस आधी न्यूझीलंड दौºयात खराब कामगिरीचा ठपका ठेवून लक्ष्मणचा पत्ता कट करण्यात आला. रायुडू सुरुवातीपासून तिसºया किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजी करतो. मागच्या आॅक्टोबरपासून त्याला चौथ्या स्थानी खेळविण्यात येत आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यातील अपयशाचे खापर फोडण्यात येऊन त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. ३३ वर्षांच्या रायुडूचे स्वप्न लक्ष्मणसारखेच भंगले.निवडकर्त्यांनी त्यावेळी लक्ष्मणऐवजी दिनेश मोंगियाला प्राधान्य दिले होते. मोंिगयाच्या निवडीमागे तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देऊ शकतो,असे कारण देण्यात आले. यंदा रायुडूऐवजी निवडण्यात आलेल्या विजय शंकरसाठी देखील मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी हेच कारण दिले. रायुडू हा केवळ फलंदाज आहे.२०१९ च्या विश्वचषकासाठी लक्ष्मणने जो पसंतीचा संघ निवडला त्यात रायुडूला स्थान दिले होते. पण आता तो देखील निराश असेल. तरीही त्याने प्रतिक्रिया देताना हा संघ संतुलित असून जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे संबोधले आहे.लक्ष्मणला वगळण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता, ‘हा माझ्या कारकिर्दीमधील सर्वात निराशाजनक क्षण होता. मी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. ही निराशा नेहमी कायम राहील. हा धक्का सहन करण्यास वेळ लागेल.’ रायुडूने देखील निराशा व्यक्त करीत निवडकर्त्यांवर खोचक शब्दात टीका केलीहोती. (वृत्तसंस्था)>2002-03 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध लक्ष्मण तीन एकदिवसीय सामने खेळला. त्यात त्याने ९, २० व १० धावा केल्या. त्यानंतर त्याची जागा घेणाºया मोंगियाने पुढील तीन एकदिवसीय सामन्यांत क्रमश: १२, २ आणि शून्य धावा केल्या होत्या. तरीही मोंगियाला विश्वचषक संघात स्थान मिळाले. रायुडूने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी न्यूझीलंडविरुद्ध ९० धावांचे योगदान दिले होते. आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात तो केवळ ३३ धावा काढू शकला.

टॅग्स :अंबाती रायुडू