"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

IND vs SA: आनंद महिंद्रा यांनी राहुल द्रविडचा व्हिडिओही शेअर केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 19:41 IST2024-06-30T19:39:40+5:302024-06-30T19:41:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Anand Mahindra On Rahul Dravid, "The World Can Be Conquered Only With Guru's Blessing", Anand Mahindra Special Post For Rahul Dravid | "गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

Anand Mahindra On Rahul Dravid : टीम इंडियाने T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा T-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. भारताच्या विजयानंतर संघातील खेळाडूंसह कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) वरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी तर राहुल द्रविडसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.

'गुरुंच्या आशीर्वादानेच...'
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली राहुल द्रविडला वर्ल्ड कप ट्रॉफी देताना दिसतोय. यानंतर द्रविड एकच जल्लोष करतो. आनंद महिंद्रा यांनी या 22 सेकंदाच्या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "क्रिकेट असो वा आयुष्य, गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं. गुरुपौर्णिमेपूर्वीच टीम इंडियाने राहुल द्रविडला दिली गुरुदक्षिणा."

आनंद महिंद्रा यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्सदेखील त्यांच्या पोस्टवर कमेंट करत राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 


 

Web Title: Anand Mahindra On Rahul Dravid, "The World Can Be Conquered Only With Guru's Blessing", Anand Mahindra Special Post For Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.