Join us  

पहिला दिवस-रात्र सामना पाहायला अमित शहा जाणार

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सामन्याला उपस्थित राहणार, असे म्हटले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 3:48 PM

Open in App

मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये इतिहास घडणार आहे. भारतामध्ये पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना कोलकाता येथील इडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे.

या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाही उपस्थित राहणार आहे. या दोन्ही देशांतील हा पहिला दिवस-रात्र सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांसाठी हा महत्वाचा क्षण असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीही या सामन्याला उपस्थित राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सामन्याला उपस्थित राहणार, असे म्हटले जात होते. पण या वृत्ताला अजून दुजोरा मिळालेला नाही. पण आता गृहमंत्री अमित शहा या सामन्याला उपस्थिती लावणार असल्याचे म्हटले जात आहे.

अमित शहा यांचे सुपूत्र जय हे सध्या बीसीसीआयच्या सचिवपदी आहेत. त्याचबरोबर अध्यक्षपदी सौरव गांगुली विराजमान झाला आहे. गांगुलीला अध्यक्षपदी विराजमान करण्यात अमित शहा यांचा महत्वाचा वाटा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे या सामन्याला अमित शहा उपस्थित राहणर असल्याचे समजते.

टॅग्स :अमित शहाभारत विरुद्ध बांगलादेश