Join us

Asia Cup 2023 : तेवढी हिंमत पाकिस्तानमध्ये नाही; आर अश्विनने जावेद मियाँदादला फैलावर घेतले, चांगलेच सुनावले

Asia Cup 2023 Controversy : आशिया कप २०२३ संदर्भात BCCI आणि PCB (BCCI vs PCB) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:13 IST

Open in App

Asia Cup 2023 Controversy : आशिया कप २०२३ संदर्भात BCCI आणि PCB (BCCI vs PCB) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले आहे, परंतु भारताने तेथे खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने खालच्या दर्जाची टीका केली. त्याला भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने उत्तर दिले. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे धाडस पाकिस्तानमध्ये नाही, असे मत अश्विनने व्यक्त केले. अश्विनची ही प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदादच्या भारताबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानानंतर आली आहे.  

सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगितले की, ''आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार होता, परंतु भारतीय क्रिकेट मंडळाचे ( BCC)  सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे, की भारतीय संघ पाक दौऱ्यावर जाणार नाही. आशिया कप स्पर्धेचे ठिकाण बदला. असे अनेकदा घडलेलं आपण पाहिलं असेल. आम्ही पाकिस्तानात जाणार नाही असे म्हटल्यावर ते म्हणाले की तेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार नाही. पण, हे शक्य होणार नाही, तेवढी हिंमत पाकिस्तानमध्ये नाही. आशिया कप २०२३ चे ठिकाण श्रीलंकेत हलवले जावे.'' 

अश्विनने पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियाँदादच्या विधानानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. मियाँदाद म्हणाले होते की, भारताशिवाय आमचे क्रिकेट चांगले चालले आहे. टीम इंडिया पाकिस्तानात येत नसेल तर आपणही भारतात जाऊ नये. भारतीय क्रिकेट खड्ड्यात जाऊ दे."

अश्विनने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ''आशिया कप श्रीलंकेत खेळवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्ड कपसह अनेक स्पर्धा दुबईत आयोजित केल्या गेल्या आहेत, त्यामुळे यंदाची आशिया कप श्रीलंकेत होण्यास मला आनंद होईल.''  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आर अश्विनएशिया कप 2022
Open in App