Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडच्या सुंदरीची अविश्वसनिय कामगिरी! हिटमॅन रोहितसह अभिषेकलाही मागे टाकत रचला नवा इतिहास

न्यूझीलंडची स्टार ऑलराउंडर अमिलिया केर हिने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:18 IST

Open in App

न्यूझीलंडची स्टार ऑलराउंडर अमिलिया केर हिने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. क्राइस्टचर्चच्या हेगले ओवलच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात अमेलिया केरनं अवघ्या ५५ चेंडूत १०५ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीसह तिने संघाला विजय मिळवून दिलाच. पण याशिवाय क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना मागे टाकत तिने अविश्वसनीय विक्रमाला गवसणी घातली. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अमेलियाची हवा!  रोहित-अभिषेकसह रिझवानला टाकले मागे

अमिलिया केर आता टी २० अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला दोन्ही गटात)  सर्वाधिक वेळा ३० पेक्षा अधिक धावा करणारी बॅटर ठरली आहे. सलग ११ डावातील दमदार कामगिरीसह तिने या खास विक्रमाला गवसणी घातली. तिने महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेची चमारी अटापट्टू आणि रोमानिया रेबेका ब्लेक (९ वेळा) यांचा विक्रम मोडीत काढला. पुरुष क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान आणि अभिषेक शर्मा (७ वेळा बार) या तिघांना तिने मागे टाकले आहे.

ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात

११ डावात ६६९ धावा अन् १२ विकेट्स

सध्याच्या घडीला अमिलिया केर सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. मागील ११ डावात तिने १४० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह एकूण ६६९ धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेसारख्या संघासमोर दमदार कामगिरी करताना तिने दोन शतके ठोकली आहेत. याशिवाय गोलंदाजीत तिने १२ विकेट्स घेतल्या आहेत. नुकतेच तिने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये  १००० धावा आणि १०० विकेट्सचा खास डाव साधला होता. 

अमेलिया केरच्या जोरावर न्यूझीलंडचा जलवा

पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात अमेलिया खेरच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली.  या मालिकेत केरनं अनुक्रमे ७८ , ३२, ३०, ३१ आणि १०५ धावांची खेळी केली.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amelia Kerr's Unbelievable Feat: Surpasses Rohit Sharma in T20 Records!

Web Summary : New Zealand's Amelia Kerr achieved a milestone in T20Is, scoring a blistering century against South Africa. She surpassed numerous records, becoming the batter with the most consecutive 30+ scores (11 innings), outshining Rohit Sharma and others. Kerr's consistent performance includes 669 runs and 12 wickets in her last 11 games.
टॅग्स :टी-20 क्रिकेटन्यूझीलंडरोहित शर्माअभिषेक शर्मा