Ambati Rayudu Retirement: रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं

रायूडूने विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 17:18 IST2019-07-03T17:15:29+5:302019-07-03T17:18:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ambati Rayudu Retirement: Ambati Rayudu named Virat Kohli in the letter written to BCCI | Ambati Rayudu Retirement: रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं

Ambati Rayudu Retirement: रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं

मुंबई : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. हा निर्णय जाहीर करत असताना रायुडूने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये रायुडूने काही खेळाडूंची नावे घेतली आहेत. रायुडूने यावेळी खेळाडूंबद्दल बीसीसीआयला काय सांगतिलं, आहे ते जाणून घेऊया...

अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे. 

त्यामुळेच धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. पण, अखेरीस त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला. 

रायुडूने यावेळी बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये रायुडूने बीसीसीआयचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचेही सांगितले आहे. रायुडूने या पत्रात विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचीही नावे घेतली आहेत. धोनी आणि रोहितपेक्षा रायुडूने कोहलीबद्दल भरभरून लिहिले आहे.

 33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे.

Web Title: Ambati Rayudu Retirement: Ambati Rayudu named Virat Kohli in the letter written to BCCI