Join us  

निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायुडू पुन्हा मैदानावर परतणार; थेट BCCI ला आव्हान 

या वर्षी मे महिन्यात चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या पाचव्या IPL विजेतेपदासाठी मदत केल्यानंतर ३७ वर्षीय रायडूने आंतरराष्ट्रीय  आणि भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 6:58 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL)मधील सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्स संघाने आगामी हंगामासाठी मार्की खेळाडू म्हणून अंबाती रायुडू याला ( Ambati Rayudu) करारबद्ध केले. CPL मध्ये खेळणारा तो प्रविण तांबे याच्यानंतर दुसरा भारतीय ठरणार आहे.  या वर्षी मे महिन्यात चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या पाचव्या IPL विजेतेपदासाठी मदत केल्यानंतर ३७ वर्षीय रायडूने आंतरराष्ट्रीय  आणि भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टेक्सास सुपर किंग्जने रायडूला USA मधील मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी करारबद्ध केले होते, परंतु लीग सुरू होण्याच्या पाच दिवस आधी रायुडूने माघार घेतली. 

बीसीसीआयने भारताच्या निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठी एक वर्षांचा कुलिंग कालावधीचा नियम आणण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे रायुडूने ही माघार घेतली. निवृत्तीनंतर १ वर्षांच्या कुलिंग  कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळता येणार आहे. या नियमातून रायुडूला सूट मिळाल्यास, परदेशातील लीगमध्ये अन्य भारतीय खेळाडूंचाही खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. लेगस्पिनर प्रवीण तांबे २०२०मध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळला होता आणि तो पुरुषांच्या CPL मध्ये खेळणारा पहिला भारतीय ठरला होता. सनी सोहल आणि स्मित पटेल हे आणखी दोन भारतीय क्रिकेटपटू पुरुष CPL मध्ये खेळले आहेत, परंतु ते USAकडून पात्र ठरले आहेत. श्रेयंका पाटील ही महिला CPL मध्ये भाग घेणारी पहिली भारतीय ठरणार आहे. तिला गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने करारबद्ध केले आहे.

"सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्समध्ये सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. आगामी CPL 2023 मध्ये संघासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे," असे रायुडू म्हणाला. रायुडू दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश आणि जॉर्ज लिंडे व अफगाणिस्तानचा इझारुलहक नावीद यांच्यासोबत परदेशी खेळाडूंमध्ये सामील होईल. १६ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ही लीग पार पडणार आहे. 

टॅग्स :अंबाती रायुडूकॅरेबियन प्रीमिअर लीग
Open in App