UPSC क्रॅक करणारा एकमेव इंटरनॅशनल क्रिकेटर, सचिन-गांगुली-द्रविड सोबत आहे खास कनेक्शन

1999 च्या वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड झाली होती. मात्र त्याला एकदाही प्लेइंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:52 PM2024-04-17T18:52:58+5:302024-04-17T18:54:09+5:30

whatsapp join usJoin us
amay khurasiya The only international cricketer to crack UPSC, Sachin-Ganguly-Dravid has a special connection | UPSC क्रॅक करणारा एकमेव इंटरनॅशनल क्रिकेटर, सचिन-गांगुली-द्रविड सोबत आहे खास कनेक्शन

UPSC क्रॅक करणारा एकमेव इंटरनॅशनल क्रिकेटर, सचिन-गांगुली-द्रविड सोबत आहे खास कनेक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आयपीएस आणि आयएएस अधिकारी होण्यासीठी विद्यार्थी ही परीक्षा देतात.  दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षेला बसतात. पण काही मोजकेच विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. या काही मोजक्या लोकांमध्येच भारताच्या एका माजी क्रिकेटरचेही नाव आहे. तो म्हणजे, अमय खुरासिया. 

सिचिन गांगुली सोबत असं कनेक्शन -  
अमय खुरासियाचा जन्म 1972 मध्ये मध्य प्रदेशात झाला होता. खुरासियाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळण्यापूर्वीच त्याने UPSC परीक्षाही उत्तीर्ण केली होती. खुरासिया सौरव गांगुली, सचिन तेंदुलकर, राहुल द्रविड, अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवागसोबतही क्रिकेट खेळलेला आहे.

1999 च्या वर्ल्ड कपसाठीही झाली होती निवड - 
अमय खुर्सियाने 1999 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध पेप्सी कपमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात खुरासियाने 45 चेंडूत 57 धावा केल्या होत्यात. 1999 च्या वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड झाली होती. मात्र त्याला एकदाही प्लेइंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फार काळ चालू शकली नही. 

...21 शतके आणि 31 अर्धशतके -
अमेय खुर्सियाने भारताकडून केवळ 12 एकदिवसीय सामने खेळले आणि 149 धावा केल्या. खुरासियाने 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, मात्र, मध्य प्रदेशसाठी त्याने 119 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 7000 हून अधिक धावा केल्या आहेत. खुरासिया हा डावखुरा फलंदाज होता. खुरासियाची सर्वोत्तम धावसंख्या 238 धावा आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 21 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. 

आता कुठे आहे खुरासिया? -
माध्यमांतील वृत्तांनुसार, अमय खुरासिया आता भारतीय कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नियुक्त आहेत. याशिवाय आयपीएल 2024 मध्ये RCB मध्ये विराट कोहलीसोबत खेळत असलेल्या रजत पाटीदारलाही त्याने क्रिकेट कोचिंग दिले आहे. तसेच राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या आवेश खानलाही त्याने ट्रेनिंग दिली आहे.
 

Web Title: amay khurasiya The only international cricketer to crack UPSC, Sachin-Ganguly-Dravid has a special connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.