Doug Bracewell Has Announced His Retirement : न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू डग ब्रेसवेल याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो न्यूझीलंडच्या कसोटी संघाबाहेर होता. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडूंना पहिली पसंती दिली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत संघात पुनरागमन करणं अशक्य आहे, हे ओळखून अनुभवी क्रिकेटपटूनं अखेर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे दिसते.२०२३ मध्ये त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवृत्तीनंतर भावूक झाला क्रिकेटर, म्हणाला...
"क्रिकेट माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं. या खेळामुळे मला आयुष्यात अनेक संधी मिळाल्या, त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी आणि देशासाठी खेळण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. फर्स्ट क्लास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
क्रिकेटचा वारचा लाभलेला खेळाडू
डग ब्रेसवेल हा क्रिकेटचा वारसा लाभलेला खेळाडू आहे. त्याचे वडील ब्रेंडन आणि काका जॉन हे दोघेही माजी क्रिकेटपटू असून त्यांनी कसोटी क्रिकेट खेळले आहे. याशिवाय जॉन यांनी न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. डगचा चुलत भाऊ मायकेल ब्रेसवेल सध्या न्यूझीलंड संघाचा भाग असून तो भारत दौऱ्यावर वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एका बाजूला चुलत भाऊ कॅप्टन्सीच्या रुपात नवी इनिंग सुरु करत असताना दुसऱ्या बाजूला डग ब्रेसवेल याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व
३५ वर्षीय डग ब्रेसवेलने न्यूझीलंडकडून तिन्ही प्रकारातील क्रिकेटमध्ये खेळला आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रेसवेलनं ७४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात कसोटीत त्याच्या नावे २८ सामन्यात ७४ विकेट्स जमा असून वनडेत २६ तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत. २०११ मध्ये होबार्टच्या मैदानातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.