Join us

तो मी नव्हेच, डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचा आरोप चुकीचा; हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण

घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 09:29 IST

Open in App

नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात जोधपूरच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पण ते ट्विट हार्दिकने केलंच नव्हतं अशी नवी माहिती आता समोर येत आहे. हार्दिक पांड्याने स्वत या स्पष्टीकरण दिले आहे. 

पांड्याने काल त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला की,माध्यमांनी चुकीचे वृत्त दिले. माध्यमांनी लोकांची दिशाभूल केली आहे. माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केले नाही. ज्या ट्विटवरुन हा वाद सुरु झाला त्या खात्यावर माझं नाव आणि फोटो जरी असला तरी ते माझं अकाऊंट नाही. मी कोणतेही पोस्ट टाकयची असल्यास माझ्या अकांउटवरुन टाकतो. माझं खात ट्विटरने अधिकृत केलं आहे. ज्या खात्यावरुन  आक्षेपार्ह ट्विट झालं ते फेक खातं आहे. मी बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा आदर करतो. भारतातील सर्व जाती-धर्माचा मी आदर करतो. आशा प्रकारचे मी कोणतेही संवेदनशील किंवा कोणाच्या भावाना दुखावतील असे ट्विट करणार नाही.

ज्या खात्यावरुन हे ट्विट केलं आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात यायला हव्या. अशा घटना रोखल्या गेल्या पाहिजेत असेही तो म्हणाला. 

 

दरम्यान,  @hardikpandya7 हे हार्दिक पांड्याचं अधिकृत ट्विटर हॅंडल आहे, पण ज्या ट्विटवरून पांड्या अडचणीत आला ते ट्विट @sirhardik3777 या पॅरोडी अकाउंटवरून करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कोर्टात तक्रार देखील @sirhardik3777 याच अकाउंटविरोधात करण्यात आल्याची माहिती आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

या तक्रारीवरून हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती.  काल ती मागणी मान्य करत कोर्टाने , पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण आता नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे पांड्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याट्विटरडॉ. बाबासाहेब आंबेडकर