Join us

दोस्त दोस्त ना राहा... आधी मुलाखतीत खुलासा, मग ट्विट; धोनी-भज्जी मध्ये नेमकं काय बिनसलंय?

MS Dhoni Harbhajan Singh, Fight Gossip : महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांनी एकेकाळी एकत्रितपणे टीम इंडियाला जिंकवून दिले अनेक सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:52 IST

Open in App

MS Dhoni Harbhajan Singh Fight Gossip : महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग हे दोघेही भारतीय क्रिकेट संघातील मॅचविनर खेळाडू होते. २००७ आणि २०११ या दोनही वर्षी भारताच्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण हरभजनने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. गेल्या १० वर्षांपासून मी धोनीशी बोललो नाही. हरभजन सिंगच्या या वक्तव्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या भुवया उंचावल्या. तशातच आता हरभजनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केल्या चर्चांना उधाण आले आहे.

धोनी - भज्जी मध्ये काय बिनसलं?

हरभजन सिंगने न्यूजएटीनशी बोलताना सांगितले होते की, 'मी धोनीशी बोलत नाही. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळत होतो तेव्हा आम्ही बोलायचो. त्याशिवाय आम्ही बोललो नाही. या गोष्टींचा १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला आहे. जेव्हा आम्ही CSK मध्ये खेळत होतो, तेव्हा आम्ही बोलायचो. पण तेदेखील केवळ मैदानापुरते मर्यादित होते, असेही हरभजन म्हणाला होता. तशातच हरभजनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ' अनोळखी लोक जितक्या सहजतेने चांगले मित्र बनू शकतात, तितक्याच सहजतेने चांगले मित्रही अचानक अनोळखी होऊ शकतात.' हरभजनने केलेल्या या पोस्टमुळे धोनी आणि त्याच्यामधील मतभेदाच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

हरभजनने याआधीही एका मुलाखतीत सांगितले होते, "मी धोनीला फोन करत नाही. मी केवळ अशा लोकांनाच फोन करतो, जे माझा फोन उचलतात. मी एखाद्या व्यक्तीशी स्वत:हून बोलायचा एक-दोन वेळा प्रयत्न करतो, पण त्यानंतर मी फारसा प्रयत्न करायला जात नाही." हरभजनच्या दोनही पोस्टवर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, धोनी आणि हरभजनने एकत्र खेळताना भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक सामने जिंकले. तसेच IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडूनही धोनी आणि हरभजन बराच काळ एकत्र खेळले. त्यामुळे आता या दोघांमध्ये असलेला वाद लवकर मिटावा, अशी इच्छा क्रिकेटचाहत्यांनाही आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीहरभजन सिंगट्विटर