Join us

Women's T20 World Cup 2023: ICC चा ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकात असणार सर्व महिला पंच आणि रेफरी; यादीत भारताचा दबदबा

Match Officials at the ICC Women’s T20 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर होणाऱ्या महिला ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:46 IST

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर होणाऱ्या महिला ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे इतिहासात प्रथमच स्पर्धेच्या सर्व सामन्यात महिला पंच असणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी आयसीसीने 10 पंच आणि 3 मॅच रेफरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. 

दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या पंचांच्या यादीत सर्व महिला पंचांची नोंद आहे. खरं तर 3 मॅच रेफरीमध्ये जीएस लक्ष्मी या भारतीय महिला पंच आहेत, याशिवाय 2 भारतीय पंच वृंदा राठी आणि एन जननी यांचा देखील समावेश झाला आहे. भारतीय संघ विश्वचषकातील सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 12 फेब्रुवारी रोजी खेळेल. तर 26 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. 

ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2023 च्या सामन्यांसाठी पंचांची अधिकृत यादी - मॅच रेफरी - जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका)

पंच - सू रेडफर्न (इंग्लंड), एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबाग (दक्षिण आफ्रिका), अन्ना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका). 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आयसीसीमहिलाद. आफ्रिका
Open in App