अ‍ॅलेस्टर कूक नाही, तर 'सर' अ‍ॅलेस्टर कूक; 2007 नंतर इंग्लंडच्या खेळाडूला प्रथमच मिळाला मान

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूकचा मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 01:19 PM2019-02-27T13:19:14+5:302019-02-27T13:19:40+5:30

whatsapp join usJoin us
Alastair Cook becomes 1st English player to attain knighthood since 2007 | अ‍ॅलेस्टर कूक नाही, तर 'सर' अ‍ॅलेस्टर कूक; 2007 नंतर इंग्लंडच्या खेळाडूला प्रथमच मिळाला मान

अ‍ॅलेस्टर कूक नाही, तर 'सर' अ‍ॅलेस्टर कूक; 2007 नंतर इंग्लंडच्या खेळाडूला प्रथमच मिळाला मान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूकचा मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला आणि तो इयान बॉथम यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. कूकने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि मंगळवारी त्याला नाइटहुड देऊन सन्मानित करण्यात आले. 2007 नंतर हा बहुमान मिळवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कूकसह आतापर्यंत इंग्लंडच्या 11 खेळाडूंना गौरविण्यात आले आहे. बकिंघम पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात कूकचा सन्मान करण्यात आला. 



नाइटहुड सन्मान दिला जात असताना कूक नर्व्हस झाला होता. तो म्हणाला,''तुम्हाला पुढे जाऊन गुडघ्यावर बसावे लागेल, असे सांगितले जाते तेव्हा नवल वाटतं. मी खुप नर्व्हस झालो होतो.'' 

34 वर्षीय कूकने गतवर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती स्वीकारली होती. ओव्हल कसोटीत कूकने शतकी खेळी करून क्रिकेटला अलविदा केले होते. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये 12472 धाव केल्या आहेत आणि इंग्लंडचा तो सर्वात यशस्वी फलंदाज आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक 33 शतकं, सर्वाधिक 161 सामने, सर्वाधिक 175 झेल आणि सर्वाधिक कसोटी 59 विजय मिळवण्याचा विक्रम कूकच्या नावावर आहे. 



कुकने 92 वन डे सामन्यात 3204 धावा केल्या आहेत. त्यात 5 शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. 


Web Title: Alastair Cook becomes 1st English player to attain knighthood since 2007

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.