Alana King's Becomes First Player To Take A Seven Wicket Haul In World Cup : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अलाना किंग हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंदूर येथील होळकर स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अलाना किंग हिने १८ धावा खर्च करताना ७ विकेट्सचा डाव साधला. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २४ व्या षटकात नेडीन डि क्लर्कला बोल्ड करत तिने सातवी विकेट आपल्या खात्यात जमा केली. ७ षटकात १८ धावा खर्च करत तिने विक्रमी डाव साधला. तिच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ २४ षटकात ९७ धावांवर ऑलआउट झाला.
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करणारी 'ती' पहिलीच
महिला वनडे क्रिकेटमध्ये तिच्याआधी पाच जणींनी सात विकेट्सचा डाव साधला आहे. इंग्लंडच्या जो चेंबरलेन हिने सर्वोत्तम स्पेल टाकताना फक्त ८ धावा खर्च करून ७ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. पण वर्ल्ड कप स्पर्धेत ७ विकेट्स घेणारी अलाना किंगही पहिली गोलंदाज ठरली आहे.
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
महिला वनडेतील सर्वोत्तम स्पेलचा रेकॉर्ड
- २०२५- अलाना किंग (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ धावांत ७ विकेट्स (वर्ल्ड कप)
- २०२५- अलाना किंग (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ धावांत ७ विके
- २०११- अनीसा मोहम्मद (वेस्ट इंडिज) विरुद्ध पाकिस्तान १४ धावांत ७ विकेट्स
- २००५ - शेली निच्के (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंडविरुद्ध २४ धावांत ७ विकेट्स
- २००३- सजीदा शाह (पाकिस्तान) विरुद्ध जपान ४ धावांत ७ विकेट्स
- १९९१- जो चेंबरलेन (इंग्लंड) विरुद्ध डेन्मार्क ८ धावांत ७ विकेट्स
फक्त तिघींनीच गाठला दुहेरी आकडा
ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. याशिवाय सिनालो जाफ्ता २९ (१७) आणि नेडीन डि क्लर्क १४ (२३) या दोघींशिवाय अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.