आधी लग्न की मॅच...; अक्षय वखरेची लगीनघाई

विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय वखरे १० फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. त्याची वाग्दत्त वधू उज्जैनची आहे. वधूकडे उज्जैन येथेच लग्नसोहळा  होणार असून अक्षय १२ जानेवारीपासून जामठा येथे होणाऱ्या इराणी करंडक सामन्यात शेष भारताविरुद्ध विदर्भ संघातून खेळणार की नाही, याचीच चर्चा होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 20:07 IST2019-02-07T20:07:11+5:302019-02-07T20:07:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
akshay wakhare wedding news | आधी लग्न की मॅच...; अक्षय वखरेची लगीनघाई

आधी लग्न की मॅच...; अक्षय वखरेची लगीनघाई

नागपूर: विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय वखरे १० फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. त्याची वाग्दत्त वधू उज्जैनची आहे. वधूकडे उज्जैन येथेच लग्नसोहळा  होणार असून अक्षय १२ जानेवारीपासून जामठा येथे होणाऱ्या इराणी करंडक सामन्यात शेष भारताविरुद्ध विदर्भ संघातून खेळणार की नाही, याचीच चर्चा होती.

दरम्यान त्याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नासाठी अक्षय सामना आटोपताच रवाना झाला. लग्न आटोपून तो ११ ला नागपुरात परत येईल. १२ पासून सुरू होणा-या सामन्यात तो सहभागी होईल. १३ ला नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात संघातील सर्व सहकारी तसेच व्हीसीएचे पदाधिकारी देखील हजेरी लावणार आहेत. स्वत:च्या स्वागत सोहळ्यात भाग घेतल्यानंतर अक्षय पुन्हा इराणी करंडकाच्या सामन्यात सहभागी होईल.

Web Title: akshay wakhare wedding news

टॅग्स :nagpurनागपूर