Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या दोन्ही किडन्या फेल, प्रशिक्षकाने मुख्यमंत्र्यांना केली मदतीसाठी विनवणी  

Akash Biswas News: बंगालच्या क्रिकेट संघामधून एक दु:खदायी बातमी समोर आली आहे. बंगालचा युवा क्रिकेटपटू आकाश बिस्वास हा जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहे. आकाश याचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले असून, डॉक्टरांनी त्याला तात्काळ मुत्रपिंड प्रत्यार्पण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:55 IST

Open in App

बंगालच्या क्रिकेट संघामधून एक दु:खदायी बातमी समोर आली आहे. बंगालचा युवा क्रिकेटपटू आकाश बिस्वास हा जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहे. आकाश याचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले असून, डॉक्टरांनी त्याला तात्काळ मुत्रपिंड प्रत्यार्पण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यासाठी येणारा प्रचंड खर्च उभा करणे कुटुंबीयांसाठी मोठं आव्हान बनलं आहे.

बंगालचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरत्न शुक्ला हे आकाश याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्यांनी आकाश बिस्वास या युवा क्रिकेटपटूचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या मदतीसाठी वैयक्तिकरीत्या पुढाकार घेण्याचं आवाहान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केलं आहे.

क्लबच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आकाश बिस्वास याची प्रकृती चिंताजनक आहे. आकाशचे दोन्ही मुत्रपिंड आता निकामी होत आले आहेत. आता त्याचे प्राण वाचवण्यासाठी मुत्रपिंड प्रत्यार्पण करणे हाच एक पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आईची किडनी त्याच्यासोबत जुळली आहे. मात्र शस्त्रक्रिया आणि उपचारांचा खर्च खूपच जास्त आहे. तसेच तो कुटुंबीयांना परवडणारा नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cricketer's Kidneys Fail; Coach Appeals to CM for Help.

Web Summary : Young Bengal cricketer Akash Biswas is battling kidney failure. Coach Laxmiratan Shukla appealed to Chief Minister Mamata Banerjee for urgent financial assistance for a kidney transplant, as the family struggles with the immense medical costs.
टॅग्स :पश्चिम बंगालभारत