नवी दिल्ली : माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
या पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अखेरचा होता. भारताकडून २६ कसोटी १९१ एकदिवसीय व तीन टी२० सामने खेळेलेल्या आगरकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४९ बळी घेतले आहेत. आगरकरशिवाय हरराणाच्या चेतन शर्मा, नयन मोंगिया, शिवरामकृष्णन, राजेश चौहान, अमेय खुरासिया, ज्ञानेंद्र पांडे व प्रीतम गंधे यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आगरकरचा या शर्यतीत समावेश होणे रोमांचक आहे. त्याने खूप विचार करुन अर्ज केला असणार. त्यामुळे आता निवड समिती अध्यक्ष कोण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.’ (वृत्तसंस्था)