Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यची नन्ही परीशी भेट; शेअर केला मुलीसोबतचा Cute फोटो

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 14:31 IST

Open in App

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे. रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता आणि त्यामुळे त्याला त्वरित मुलीची भेट घेता आली नव्हती. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून भारतने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर रहाणे त्वरित मुंबईत परतला आणि आपल्या परीला भेटला. सोमवारी त्यानं कन्येसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे अजिंक्य बाप झाल्याची माहिती दिली होती. भज्जीनं ट्विट करून अजिंक्य रहाणे बापमाणूस झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली. अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.  

ICC World Test Championship : कसोटी 'वर्ल्ड कप'च्या शर्यतीत टीम इंडियाची भक्कम आघाडीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात रोहित शर्मानं दोन्ही डावांत शतकी खेळी केली. मयांक अग्रवालनं द्विशतक झळकावलं.  आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या व दुसऱ्या डावात एकूण अनुक्रमे आठ व 6 विकेट्स घेतल्या. शिवाय 70 धावाही केल्या. भारतीय संघाने उत्तम सांघिक खेळाचे दर्शन घडवले. 

चौथ्या डावात 395 धावांच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 191 धावांत तंबूत परतला. मोहम्मद शमीनं 10.5 षटकांत 35 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जडेजानंही चार विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. भारताने विजय मिळवून खात्यात आणखी 40 गुण जमा केले आहेत. आता 160 गुणांसह भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना दोन विजय आणि एक अनिर्णित निकालानंतर प्रत्येकी 56 गुणांसह अनुक्रमे पाचव्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. 

 

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका