हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

बुमराहसंदर्भात अजिंक्य रहाणेची 'बोलंदाजी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 20:25 IST2025-08-09T20:17:34+5:302025-08-09T20:25:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ajinkya Rahane Praised Jasprit Bumrah To Saying Team Management On Which Match He Available To Play | हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Ajinkya Rahane On Jasprit Bumrah : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरीचा डाव साधला. ओव्हलच्या मैदानातील अखेरचा सामना जिंकत पिछाडीवर असताना भारतीय संघाने मालिका २-२ बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपला, पण जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडसंदर्भातील अजूनही चर्चेत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बुमराहसंदर्भात अजिंक्य रहाणेची 'बोलंदाजी'

 जसप्रीत बुमराहनं महत्त्वाच्या क्षणी टीम इंडियाची साथ सोडली, ही गोष्ट काहींना खटकल्याचेही पाहायला मिळाले. आता भारताचा माजी कर्णधार अन् अनुभवी क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने भारतीय गोलंदाजासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. बुमराहनं जो निर्णय घेतला तो खूप मुश्किल होता, अशा परिस्थितीत संघातून बाहेर फेकले जाण्याची जोखीम असते, अशा आशयाच्या शब्दांत अजिंक्य रहाणे यानं बुमराहच्या वर्कलोडसंदर्भातील मुद्यावर आापलं मत मांडलं आाहे.

रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

हा निर्णय घेणं सोपं नसतं, काही खेळाडूंना बाहेरचा रस्ताही दाखवला जातो


जसप्रीत बुमराहनं इंग्लंड दौऱ्यात फक्त तीन सामने खेळणार हे आधीच स्पष्ट केले होते. कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटला त्याने याची कल्पना दिली. ही गोष्ट कर्णधारासाठी पुढच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने सोयीची होती. पण हा निर्णय बुमराहसाठी सोपा नव्हता. अशा परिस्थितीत संघातून बाहेर रस्ता दाखवण्याची जोखीम असते. पण तरीही बुमराहने मालिकेआधी आपली भूमिका स्पष्ट मांडली. त्याची ही गोष्ट आवडली, असे म्हणत अजिंक्य रहाणेनं बुमराहच्या भूमिका योग्य अन् संघाला सावध करणारी होती, असे म्हटले आहे. युट्यूबवरील आपल्या खास व्हिडिओच्या माध्यमातून त्याने हे मत मांडले. 

३ सामन्यात दोन वेळा पंजा अन् १४ विकेट्स, पण...

इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह ठरल्याप्रमाणे ३ कसोटी सामने खेळला. यातील एका सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधण्यासोबत त्याने १४ विकेट्स आपल्या  खात्यात जमा केल्या. पण तो खेळलेला एकही सामना भारतीय संघाने जिंकला नाही. लीड्सच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर बुमराहनं विश्रांती घेतली. त्यानंतर तो लॉर्ड्स अन् मँचेस्टरच्या मैदानातील कसोटी सामन्यात खेळला. या तीन सामन्यातील मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली तर अन्य दोन मैदानात टीम इंडियाच्या पदरी पराभवच पडला. ओव्हल कसोटी सामन्याआधी बुमराहला रिलीज करण्यात आले. अन् त्याच्या अनुपस्थितीत या मालिकेत टीम इंडियाने बर्मिंगहॅमनंतर ओव्हलच्या मैदानात दुसरा सामना जिंकला.

Web Title: Ajinkya Rahane Praised Jasprit Bumrah To Saying Team Management On Which Match He Available To Play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.