९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक

Ajinkya Rahane, Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai vs Andhra : अजिंक्य रहाणेच्या झंझावाती खेळीमुळे मुंबई संघाने विजयासह गाठली बाद फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 23:40 IST2024-12-05T23:39:40+5:302024-12-05T23:40:36+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane heroics in batting Mumbai recorded highest chase in Syed Mushtaq Ali Trophy to beat Andhra and qualify for the knockouts | ९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक

९ चौकार, ४ षटकार... Ajinkya Rahane ने केली गोलंदाजांची धुलाई, थोडक्यात हुकलं शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ajinkya Rahane, Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai vs Andhra : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या स्पर्धेत मुंबई संघाने आंध्र प्रदेशचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईच्या संघाने सर्वाधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग (highest successful run chase) करण्याचा नवा विक्रम केला. तसेच, बाद फेरीतही धडक मारली. मुंबईसाठी अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केली. त्याने ९५ धावांची स्फोटक खेळी केली. रहाणेचे शतक थोडक्यात हुकले, पण ९ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने त्याने संघाला विजयापर्यंत नेले. रहाणेव्यतिरिक्त पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यांश शेडगे यांनीही महत्त्वपूर्ण खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने २२९ धावा केल्या. त्यांच्यासाठी केएस भरतने स्फोटक खेळी खेळली. त्याने ५३ चेंडूंचा सामना करत ९३ धावा केल्या. भरतने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार रिकी भुईने ६८ धावांची खेळी केली. ३१ चेंडूंचा सामना करताना त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर अश्विन हेबरने ५२ धावांची दमदार खेळी केली.

मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले. ३४ धावांची दमदार खेळी केल्यानंतर पृथ्वी बाद झाला. अजिंक्य रहाणेला मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने ५४ चेंडूंचा सामना करत ९५ धावा केल्या. रहाणेच्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने ११ चेंडूत २५ धावा केल्या. त्यानेही ३ षटकार मारले.

युवा सुर्यांश शेडगेची बॅटही तळपली

सूर्यांश शेडगेने मुंबईसाठी दमदार फिनिशिंग केली. तो विजयाचा हिरोही ठरला. सूर्यांशने केवळ ८ चेंडूंचा सामना करत नाबाद ३० धावा केल्या. सूर्यांशच्या या खेळीत ३ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. सूर्यांशने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत नवा विक्रम रचला. तसेच या विजयाच्या सहाय्याने मुंबईने बाद फेरीत धडक मारली.

Web Title: Ajinkya Rahane heroics in batting Mumbai recorded highest chase in Syed Mushtaq Ali Trophy to beat Andhra and qualify for the knockouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.