Join us

लिफ्ट घेत गाठायचा मैदान; टीम इंडियाकडून खेळताना घेतली पहिली कार; त्यातही ती होती 'सेकंड हँड'

चला तर मग जाणून घेऊयात अजिंक्य रहाणेनं शेअर केलेली खास अन् फॉलो करण्याजोगी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:20 IST

Open in App

भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे हा आज कोट्यवधींचा मालक आहे. पण आजही तो साधेपणासह वावरताना दिसते. यामागचं कारण यशाची पायरी चढताना त्यानं जो संघर्षाचा सामना केलाय ते तो अजूनही विसरलेला नाही. हीच गोष्ट या क्रिकेटरला आणखी मोठं करते. जे काही मिळालं ते फक्त अन् फक्त क्रिकेटमुळे असे तो मानतो.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्य रहाणेनं क्रिकेटच्या प्रवासादरम्यानच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. यात त्याने क्रिकेटच्या खेळाशिवाय पैशाचं महत्त्व आणि बचत यासंदर्भातील किस्से सांगितले आहेत. क्रिकेटरच्या या गोष्टी प्रत्येकानं आपल्यामध्ये अंगीकारण्याजोग्या अशाच आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अजिंक्य रहाणेनं शेअर केलेली खास अन् फॉलो करण्याजोगी गोष्ट

 वयाच्या आठव्या वर्षांपासून लोकल ट्रेनचा प्रवास, तोही एकला चलो रे!

पैशाला किती महत्त्व देतोस? अनावश्यक खर्च करणं टाळतोस का? या आशयाचा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, माझ्यासाठी सुरुवातीचा काळ खूप आव्हानात्मक होता. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. क्रिकेट खेळण्यासाठी डोंबिवलीतून मी लोकल ट्रेनचा प्रवास करायचो. वडिलांना ऑफिसला जायचं असल्यामुळे वयाच्या ८ व्या वर्षांपासून एकटेच बाहेर पडावे लागायचे, असेही त्याने सांगितले. 

दुसऱ्यांची लेकरं सांभाळ करत  कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावायची आई

वडिलांचा पगार हा कुटुंबियांतील खर्च भागवण्यासाठी पुरेसा नसायचा. परिणामी घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी माझी आई नोकरदार पालकांच्या लेकरांचं संगोपन करण्याचं काम (babysit) करायची. ही गोष्ट मी आजही विसरलोलो नाही. त्यामुळेच मी नेहमी जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो.  ही प्रसिद्धी आणि पैसा फक्त क्रिकेटच्या खेळामुळे मिळाले, असेही अजिंक्य रहाणेनं म्हटलं आहे.

खर्च करा, पण....

प्रसिद्धी आणि पैसा यामुळे अनेकजण वाया गेल्याचे किस्सेही तुम्ही ऐकले असतली. पण अजिंक्य रहाणे तसा नाही. मोठ्या कमाईतून पैसा येऊ लागला त्यावेळी त्यात वाहत जाण्याची इच्छा झाली नाही का? असा प्रश्नही अजिंक्यला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, मी कधीच अशा प्रवाहात गेलो नाही. ही गोष्ट मी माझ्या कुटुंबियांकडून शिकलो. खर्च करू नका असे ते कधीच म्हणाले नाहीत, पण गरज असेल तर खर्च करा, ही गोष्ट मी लहानपणीच शिकलो होते, असे सांगत त्याने गरजेशिवाय पैसा खर्च करु नये, असा एक संदेश दिला आहे.

आधी सहकाऱ्यांकडे मागायचा लिफ्ट, मग घेतली होती सेकंड हँड कार

 

यावेळी अजिंक्य रहाणेनं आयुष्यात खूप उशीराने वाहन  खरेदी केल्याचा  किस्साही सांगितला. तो म्हणाला की, सुरुवातीच्या काळात मी बहुतांश वेळा आविष्कार साळवी किंवा प्रवीण तांबे यांच्याकडे लिफ्ट मागयचो. भारतीय संघाकडून खेळत असताना मी सेकंड-हँड वॅगनआर खरेदी केली. लोक म्हणायचे की, आता मोठी कार घे. पण माझ्यासाठी आरामदायी प्रवास त्याने शक्य होता. माझा कल हा हुशारीनं गुंतवणूक करावी, याकडे होते. दोन वर्षांनी मी मी होंडा सिटी कार खरेदी केली, असे सांगत त्याने गरजेनुसार पैसा खर्च करण्याचा फंडाच सांगितला आहे. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघरणजी करंडकऑफ द फिल्ड