भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने इंस्टाग्रामवर एक फॅमिली फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. तिने ऑक्टोबरमध्ये पाळणा हलणार असल्याचे संकेत दिले. ऑक्टोबर २०१९मध्ये रहाणेच्या घरी पहिल्यांदा पाळणा हलला होता आणि तेव्हा मुलगी आर्याचा जन्म झाला होता. राधिकाने शुक्रवारी इंस्टावर ही पोस्ट लिहिली आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिनेही या पोस्टवर रिअॅक्शन दिली.
राधिकाच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. रितिकाने 'दोन दोन ' अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसन हिनेही अभिनंदन केले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला
अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचे अखेरचे प्रतिनिधित्व केले होते. खराब फॉर्मामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी निवडले गेले नाही. आयपीएल २०२२मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून ७ सामन्यांत १३३ धावा केल्या.