अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका

आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:08 IST2025-11-27T10:07:54+5:302025-11-27T10:08:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ajinkya Rahane aggressive half-century; Mushtaq Ali T20: Mumbai Railways' blow | अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका

अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका

लखनौ - अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने तडाखेबंद अर्धशतक झळकावत मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील रेल्वे विरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. रहाणेच्या जोरावर मुंबईने अ गटात विजयी सलामी देताना रेल्वेला ७ गड्यांनी नमवले. मुंबई आता शुक्रवारी विदर्भ संघाविरुद्ध खेळेल. 

इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईने रेल्वेला २० षटकांत ५ बाद १५८ धावांवर रोखले. हे लक्ष्य मुंबईने १५.५ षटकांमध्येच ३ बाद १५९ धावा काढून सहज पार केले. सलामीवीर रहाणेने ३३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६२ धावांचा तडाखा दिला. तो कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर स्वयंचीत (हिटविकेट) होऊन तंबूत परतला.

आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या. त्याने रहाणेसोबत ५१ धावांची भागीदारी केली. हार्दिक तामोरे (नाबाद २३) व शिवम दुबे (नाबाद ५) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्का मारला. त्याआधी, गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर मुंबईने रेल्वेला मर्यादित धावसंख्येत रोखले. आशुतोष शर्माने ३० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावा फटकावल्याने रेल्वेला समाधानकारक मजल मारता आली. मोहम्मद सैफनेही (३७ चेंडूंत ४८ धावा) उपयुक्त खेळी केली. 

Web Title : मुश्ताक अली टी20 में रहाणे का विस्फोटक अर्धशतक, मुंबई की जीत।

Web Summary : अजिंक्य रहाणे के तूफानी अर्धशतक की बदौलत मुंबई ने सैयद मुश्ताक अली टी20 टूर्नामेंट में रेलवे पर 7 विकेट से शानदार जीत दर्ज की। मुंबई ने रहाणे के 62 रनों की मदद से 159 रनों का लक्ष्य आसानी से हासिल कर लिया।

Web Title : Rahane's explosive fifty propels Mumbai to victory in Mushtaq Ali T20.

Web Summary : Ajinkya Rahane's blistering half-century powered Mumbai to a convincing 7-wicket win over Railways in the Syed Mushtaq Ali T20 tournament. Mumbai chased down the target of 159 with ease, Rahane's 62 leading the charge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.