IND vs SA Turning Point Of The Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावांचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. या सामन्यात भारताकडून विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतके ठोकली, तर पाहुण्या संघाकडून एडन मार्करमनं तडाखेबंद शतकासह ‘काऊंटर अटॅक’ केला. याशिवाय भारताचा कर्णधार केएल राहुलसह दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रीट्झके यांनी अर्धशतके झळकावली. तीन शतकं आणि तीन अर्धशतकांनी मिळून सामन्यात ७०० हून अधिक धावा झाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट-ऋतुराजच्या शतकावर भारी पडली मार्करमची शतकी खेळी
रायपूरच्या मैदानात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विक्रमी विजय मिळवून मालिकेत १-१ असा बरोबरीचा डाव साधला. भारताची दोन शतकांवर मार्करमचं जे शतक भारी ठरलं. त्याची खेळी बहरण्यात यशस्वी जैस्वालनं हातभार लावल्याचे पाहायला मिळाले.
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १७ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने मार्करमचा 'करेक्ट कार्यक्रम' केलाच होता. पण यशस्वी जैस्वालनं सीमारेषेवर एक सोपा झेल सोडला. ज्या चेंडूवर भारतीय संघाला विकेट मिळायला हवी होती त्या चेंडूवर आफ्रिकेच्या संघाला ६ धावा मिळाल्या. एवढेच नाही तर मार्करमनं ५३ धावांवर जीवनदानच्या स्वरुपात मिळालेल्या संधीच सोनं करत संघाच्या धावसंख्येत ५७ धावांची भर घातली. शतकी खेळीसह मार्करमनं सामना दक्षिण आफ्रिकेकडे झुकवला. हाच क्षण या सामन्याचा खरा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
जर तो झेल झाला असता तर...
भारतीय संघाने दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करताना एडन मार्करम सुरुवातीला अडखळत खेळताना दिसला. संयमी खेळी करत त्याने आधी ५२ चेंडूचा सामना करत अर्धशतकाला गवसणी घातली. झेल सुटल्यावर तो भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. वनडे कारकिर्दीतील चौथे शतक झळकावताना त्याने ९८ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं सेट केला. जर त्याचा झेल झाला असता तर सामन्याचा निकाल निश्चितच वेगळा असता.