तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?

विराट कोहलीमुळे बाबर आझमची क्रिकेट कारकिर्द  धोक्यात आलीये असं त्याला का वाटतंय? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:15 IST2025-08-14T14:49:19+5:302025-08-14T15:15:03+5:30

whatsapp join usJoin us
Ahmed Shehzad Said Comparisons With Virat Kohli Main Reason Behind Babar Azam Downfall | तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?

तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Main Reason Behind Babar Azam Downfall : पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, असे बोलले जाते. एवढेच काय तर त्याची तुलना विराट कोहलीसोबतही झालीये. पण सध्याच्या घडीला बाबर आझम चागलाच संघर्ष करताना दिसतोय. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे बाबर आझमला टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. वनडेत त्याच्यावर भरवसा ठेवला, पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतही तो सपशेल अपयशी ठरला. 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण सांगताना माजी पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद याने विराट कोहलीचं नाव घेतलं आहे. नेमकं तो काय म्हणाला? विराट कोहलीमुळे बाबर आझमची क्रिकेट कारकिर्द  धोक्यात आलीये असं त्याला का वाटतंय? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराटमुळे संघर्षाच्या गर्तेत अडकलाय आझम; ते कसं?

स्थाननिक 'जिओ सुपर' टेलिव्हिजन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी क्रिकेटर अहमद शहजाद याने बाबर आझमच्या पडत्या काळातील गोष्टीवर भाष्य केले. तो म्हणाला आहे की,  एका बाजूला सर्व काही ठिक सुरु असताना दुसऱ्या बाजूला खेळाडूंची तुलना करण्याची मोहिम सुरु होती. आता तो खेळत नाही तर तुम्ही म्हणता की, दोन्ही खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. मुळात कोणत्याही खेळाडूची तुलना करणं योग्य नाही, असे मला वाटते. विराट कोहलीसोबत तुलना केल्यामुळे बाबर आझमवरील दबाव वाढला. परिणामी त्याच्या कामगिरीत घसरण झालीये, असे मत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं मांडलं आहे.

मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

किंग कोहलीसंदर्भात मोठं वक्तव्य करताना पाक माजी क्रिकेटरनं धोनीचंही घेतलं नाव, म्हणाला...

विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू आहे. त्याची तुलना कोणत्याही खेळाडूशी होऊ शकत नाही. धोनीशीही त्याची तुलना होऊ शकत नाही, असे मोठं वक्तव्यही अहमद शहजाद याने यावेळी केले आहे. एक कर्णधाराच्या रुपात धोनी महान आहे, पण ज्यावेळी तुम्ही बॅटरचा विचार करता त्यावेळी कोहलीचा हात कुणीच धरू शकत नाही, अशा आशयाच्या शब्दांत त्याने दोन्ही भारतीय दिग्गजांबद्दल मत मांडले आहे.

Web Title: Ahmed Shehzad Said Comparisons With Virat Kohli Main Reason Behind Babar Azam Downfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.