Join us

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; आशिया चषकातील महासंग्रामाआधी 'फ्रेंडशिप कप' जिंकला

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बुधवारी या दोन उभय संघांमध्ये रंगणारे महासंग्रामाची प्रत्येक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 17:12 IST

Open in App

दुबई : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बुधवारी या दोन उभय संघांमध्ये रंगणारे महासंग्रामाची प्रत्येक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. पण, या लढतीपूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाने मंगळवारी पाकिस्तानच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाला पराभवाची चव चाखवली.

सोमजीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 16 षटकांत 92 धावांवर माघारी परतला. भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. व्हिलचेअर संघाच्या या विजयाने रोहित शर्माच्या संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरचा सामना 15 महिन्यांपूर्वी झाला होता. आयसीसी चॅम्पियन्स चषक लढतीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला होता. 

टॅग्स :आशिया चषकभारत