Join us

IPL 2023 : अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI अलर्ट, खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला; जाणून घ्या कारण

IPL 2023: मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:30 IST

Open in App

IPL 2023: मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे. त्यांच्या मुलीवर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे, त्यांची मुलगी अनिक्षा हिला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत बीसीसीआयनेही आपल्या खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि इशाराही दिला आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी २० फेब्रुवारी रोजी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी आरोप केला आहे की अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी आपल्याला धमकी दिली आहे. त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे की, दीर्घकाळ संबंध निर्माण केल्यानंतर अनिक्षाने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. अनिक्षाने यासाठी एक कोटी रुपये देण्याचे आमीष दाखवले. अमृता यांच्या आरोपानुसार, याला नकार दिल्याने तिने खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.

अनिलवर अनेक गुन्हे दाखल आहेत, तो एकेकाळी आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीसाठी ओळखला जात होता. रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल सामन्यांवर अनेक कोटींचा सट्टा लावत असे. त्याच्या अटकेनंतर बीसीसीआयने खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सट्टेबाज खेळाडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील अशी भीती बीसीसीआयला आहे, त्यामुळे बोर्डाने खेळाडूंना हा इशारा दिला आहे. जर बुकी किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर खेळाडूंना बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देण्यास सांगितले आहे.

आयपीएलचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्सवर २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बीसीसीआयअमृता फडणवीसमॅच फिक्सिंग
Open in App