Join us

Ricky Ponting on Team India Captaincy: Rohit Sharma च्या नंतर 'हा' खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार म्हणून यशस्वी होणार- रिकी पॉन्टींग

रोहित शर्मा आणि 'त्या' खेळाडूत बरीच समानता असल्याचंही पॉन्टींग म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:34 IST

Open in App

Ricky Ponting on Team India Captaincy, IPL 2022: आजपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. CSK vs KKR हा पहिला सामना होणार आहे. Mumbai Indians चा सलामीचा सामना उद्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टींग याने Rohit Sharma नंतर भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराबाबत विधान केलं. दोन वेळा वन डे विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने एक मोठं वक्तव्य केलं.

यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्यास तो नक्कीच यशस्वी कर्णधार ठरेल यात शंका नाही, असं मोठं विधान पाँटींगने केलं. गेल्या मोसमात दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचे (डीसी) कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघाने IPL 2021 मध्ये चांगली कामगिरी केली होती.

पॉन्टिंग ऑनलाईन मुलाखती दरम्यान म्हणाला, "प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या IPL स्पर्धेत पंतला कर्णधारपदाचा अनुभव मिळतोय. त्यामुळे रिषभ आगामी काळात आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असू शकतो यात शंका नाही. रिषभ पंत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक समानता आहेत. त्याने रोहितची कारकीर्द जवळून पाहिली आहे. तो कशाप्रकारे एक यशस्वी कर्णधार बनला हे त्यांनी पाहिलंय."

"रोहितने मुंबईचे कर्णधारपद सुरू केले तेव्हा तो खूपच लहान होता आणि त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो त्यावेळी २३-२४ वर्षांचा असेल आणि रिषभ पंतही तेवढाच आहे. म्हणून ते दोघे खूप समान आहेत", असं पॉन्टींग म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ
Open in App