नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफर

अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:12 IST2019-07-03T12:37:04+5:302019-07-03T13:12:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
After ICC World Cup 2019 snub, Ambati Rayudu gets permanent citizenship offer from another country | नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफर

नाराज अंबाती रायुडू निवृत्त, 'या' देशानं दिली क्रिकेट खेळण्याची ऑफर

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे. त्यामुळेच धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले. पण, रायुडूसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नाराज रायुडूला मंगळवारी आइसलँड क्रिकेट मंडळानं त्यांच्याकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर दिली आहे. शिवाय आइसलँडचे नागरिकत्वही देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. त्याच्या जागी संधी मिळालेल्या विजय शंकरलाही फार काही कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे आता आइसलँड संघाने त्याला ऑफर दिली आहे.''अंबाती रायुडूनं त्याचं 3D ग्लास आता तरी बाजूला ठेवायला हवा. आम्ही तयार केलेले कागदपत्र वाचण्यासाठी त्याला साधारण चष्माही पुरेसा आहे. आमच्या संघाकडून खेळ,'' असे आइसलँड क्रिकेटनं ट्विट केलं. 


रहाणे, रायुडूच्या नावाचा विचार झाला, पण मयांकने बाजी मारली...कारण ? 
लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दुखापतग्रस्त झाल्यामुळे विजय शंकरला वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अगरवालचे नाव समोर आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विजयच्या जागी अंबाती रायुडू किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एक नाव समोर येणं अपेक्षित होतं. पण मयांकचं नाव आलं.. मयांकची निवड का? 

"मयांकने गतवर्षी भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे पॉवरप्ले मध्ये कशी फटकेबाजी करायची आणि फिरकीचा सामना कसा करायचा हे त्याला माहित आहे. राहुल द्रविडनेही त्याचे कौतुक केले होते आणि त्याचा विचार करण्यात आला. रहाणे मधल्या फळीत अडकला आहे आणि फिरकीचा सामना करताना तो अडखळतो. रायुडूची कामगिरी निराशाजनक झालेली आहे," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: After ICC World Cup 2019 snub, Ambati Rayudu gets permanent citizenship offer from another country