भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छाल यांचे लग्न होणार होते. परंतू, वडिलांची तब्येत बिघडल्याने स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. रविवारी २३ नोव्हेंबरला दुपारी हे लग्न होणार होते. परंतू, वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला होता. यातून सावरत नाही तोच स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याचीही तब्येत बिघडली आहे.
रविवारी सकाळी नाश्ता करत असताना स्मृती मंधाना यांचे वडील श्रीनिवास मंधांना यांची तब्येत बिघडली. थोडा वेळ वाट पाहिल्यावररुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. सध्याच्या घडीला ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पलाश मुच्छलची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पलाश मुच्छल हे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात गेले होते. त्यांना व्हायरल इन्फेक्शन आणि अॅसिडिटीची तक्रार होती. वृत्तानुसार, त्यांची प्रकृती गंभीर नाही. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले आहेत.