Join us

जर रोहित CSK कडून खेळला तर? भारताच्या माजी खेळाडूचा प्रश्न; चाहते म्हणाले, "स्वप्नात...", 

मुंबईच्या फ्रँचायझीने मोठा निर्णय जाहीर करत हार्दिक पांड्याची कर्णधारपदी वर्णी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:00 IST

Open in App

मुंबई : रोहित शर्मालामुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. शुक्रवारी मुंबईच्या फ्रँचायझीने मोठा निर्णय जाहीर करत हार्दिक पांड्याची कर्णधारपदी वर्णी लावली. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. जवळपास पाच लाख चाहत्यांनी मुंबईला सोशल मीडियावर अनफॉलो करून आपला रोष व्यक्त केला. चाहत्यांसह खेळाडूंना देखील या निर्णयाने धक्का बसला. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर भारताचा माजी खेळाडू एस बद्रिनाथने एक भन्नाट प्रश्न चाहत्यांना विचारला. रोहित चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला तर? असे त्याने म्हटले. 

रोहितच्याच नेतृत्वात मुंबईने पाचवेळा किताब पटकावण्याची किमया साधली. पण, हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपवण्याचा धाडसी निर्णय मुंबईने का घेतला असावा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. जाणकारांच्या मते संघरचनेत बदल केल्याने मुंबईच्या संघाला नवी उभारी मिळेल. तर दुसरीकडे चाहते संताप व्यक्त करत आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. 

रोहितला कर्णधापदावरून काढल्यानंतर एस बद्रिनाथने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या. त्याने म्हटले, "मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी नेहमी दूरदूष्टी पाहून पावले टाकत आली आहे. कठोर निर्णय घेण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. म्हणूनच त्यांची फ्रँचायझी एवढी यशस्वी आहे. आयपीएलचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी शानदार आहे. पाचवेळा किताब जिंकणे ही एक मोठी बाब आहे. मला वाटते की, मुंबईच्या फ्रँचायझीने संघाच्या भविष्याचा विचार करून हार्दिकला कर्णधार बनवले आहे." 

बद्रिनाथने चेन्नईच्या जर्सीतील रोहित शर्माचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि असे झाले तर? असा प्रश्न केला. यावर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत असून काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी हे केवळ स्वप्नात होऊ शकते असे मिश्किलपणे म्हटले. 

हार्दिकची एन्ट्री अन् कर्णधारपद हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सहार्दिक पांड्याआयपीएल २०२३