Hardik Pandya: लग्नानंतर हार्दिक-नताशाने 'काला चष्मा' गाण्यावर धरला ठेका; video viral

hardik pandya marriage: हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:45 IST2023-02-16T18:44:28+5:302023-02-16T18:45:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
After getting married for the second time, Hardik Pandya and Natasa Stankovic danced to the song Kala Chashma, the video went viral  | Hardik Pandya: लग्नानंतर हार्दिक-नताशाने 'काला चष्मा' गाण्यावर धरला ठेका; video viral

Hardik Pandya: लग्नानंतर हार्दिक-नताशाने 'काला चष्मा' गाण्यावर धरला ठेका; video viral

hardik pandya wife । नवी दिल्ली : भारतीय संघाचा (Indian Cricket Team) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे. हा विवाहसोहळा 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूरमध्ये येथे पार पडला. खरं तर 13 मे 2020 रोजी या जोडप्याने मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते. पण त्यावेळी कोविडमुळे कोणताही मोठा सोहळा साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे हार्दिक-नताशाने पुन्हा लग्न करून त्यांचा अपूर्ण सोहळा पूर्ण केला आहे. 

दरम्यान, लग्नानंतर या जोडप्याने डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चाहत्यांकडून देखील हार्दिक-नताशाच्या या स्टाइलला पसंती मिळत आहे. लग्नाचे काही फोटो हार्दिक आणि नताशा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आधीच शेअर केले आहेत. टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या लग्नासाठी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर नताशाचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक आणि नताशा यांन एक मूलही आहे. त्यांचा मुलगा अगस्त याने लग्नात सूट घातला होता.

दरम्यान, हार्दिक पांड्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो नताशाला पहिल्यांदा एका नाईट क्लबमध्ये भेटला होता. तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री नताशाला पांड्या क्रिकेटर असल्याची कल्पना नव्हती. या भेटीनंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली, त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट देखील केले त्यानंतर पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी नताशाला प्रपोज केले. मग त्याच वर्षी मे महिन्यात कोर्ट मॅरेज केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: After getting married for the second time, Hardik Pandya and Natasa Stankovic danced to the song Kala Chashma, the video went viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.