Join us

आफ्रिकेत अनुष्काच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या विराटने 'हा' फोटो केला पोस्ट

क्रिकेटच्या मैदानावर यशोशिखर गाठणाऱ्या कोहलीला या दरम्यान  पत्नी अनुष्का शर्माचीही आठवण येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 15:58 IST

Open in App
ठळक मुद्देटी-20 मालिकेतील दुसऱ्या वनडेआधी विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

जोहान्सबर्ग - कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या क्रिकेट करियरमधला सुवर्णकाळ अनुभवत आहे. दक्षिण आफ्रिकेत एकापाठोपाठ एक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराटने 26 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत भारताला एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून दिला. आफ्रिकेत खोऱ्याने धावा वसूल करणाऱ्या विराटने सहा वनडेमध्ये मिळून 558 धावा केल्या आहेत. 

क्रिकेटच्या मैदानावर यशोशिखर गाठणाऱ्या कोहलीला या दरम्यान  पत्नी अनुष्का शर्माचीही आठवण येत आहे. टी-20 मालिकेतील दुसऱ्या वनडेआधी विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. My one and only! असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. 

विराटचा हा फोटो चाहत्यांना इतका भावला आहे कि, लाइकचा पाऊस पडत आहे. फोटो काढल्यानंतर पहिल्या 17 मिनिटात 1,21,353 लोकांनी फोटो लाइक केला.               

हा आमचा सांघिक विजय सर्वच खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आम्ही विजय मिळवू शकलो. हा एक उत्कृष्ट सांघिक विजय होता,’ अशी प्रतिक्रीया देत कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या पहिल्या टी२० सामन्यातील विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.

सामन्यातील कामगिरीबाबत कोहली म्हणाला की, ‘या सामन्यासाठी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी होती. आघाडीच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये होते. एकूणंच संघाची फलंदाजी शानदार ठरली. यानंतर भुवनेश्वरने आपल्या अनुभवाच्या जोरावर अर्धा संघ बाद केला. हा विजय पूर्णपणे सांघिक कामगिरीमुळे शक्य झाला.’

त्याचप्रमाणे, ‘अनेक काळापासून आम्ही टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात होतो. हे आमचे सर्वांत संतुलित प्रदर्शन होते. त्याचवेळी, अंतिम षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने शानदार गोलंदाजी केली आणि त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. आम्ही १६व्या षटकात २२० धावांचे लक्ष्य बाळगले होते. मात्र, धोनी बाद झाल्यानंतर धावांची गती कमी झाली. परंतु, शेवटी विजय मिळवण्यास काढलेल्या धावा पुरेशा ठरल्या,’ असेही कोहलीने यावेळी म्हटले.                  

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८