Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ishant Sharma: प्रेमळ, पण हक्काने रागावतो ‘कॅप्टन कूल’, इशांत शर्माने व्यक्त केल्या भावना

Ishant Sharma: संपूर्ण क्रिकेटविश्वात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचा अनेकांना प्रत्यय येतो. मात्र भारताच्या इशांत शर्माला धोनी अजिबात कॅप्टन कूल वाटत नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 06:24 IST

Open in App

नवी दिल्ली : संपूर्ण क्रिकेटविश्वात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचा अनेकांना प्रत्यय येतो. मात्र भारताच्या इशांत शर्माला धोनी अजिबात कॅप्टन कूल वाटत नाही.

त्याच्या मते, धोनीला ही उपाधी देणे चुकीचे आहे. तो मैदानावर अनेकदा खेळाडूंवर ओरडत असतो. शिवाय माझ्यासह अनेकांनी त्याच्या भरपूर शिव्याही खाल्ल्या आहेत. सध्या भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेल्या इशांत शर्माने एका यू-ट्यूब चॅनलला मुलाखत दिती. त्यावेळी त्याला धोनीच्या शांत स्वभावावरून प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना इशांत म्हणाला, धोनी कुठल्याच बाजूने मला कूल वाटत नाही. तो अनेकदा खेळाडूंवर चिडतो. फक्त फरक एवढा असतो की कॅमेऱ्यासमोर तो या गोष्टी करत नाही. कॅमेरा फिरला की त्याचे रौद्र रूप पाहण्यासारखे असते. पण मी हे सगळे टीका म्हणून नाही तर गमतीच्या स्वरात सांगतो आहे. त्याच्या रागविण्याचा कुठल्याही खेळाडूला अजिबात राग येत नाही. मला तर अनेकदा त्याचा ओरडा खावा लागला. मी माही भाईला विचारलेसुद्धा होते की तुम्ही माझ्यावर इतके का चिडता. त्यावर ते म्हणाले की, मी ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो त्यांना हक्काने रागावतोसुद्धा.यानंतर धोनीमध्ये असलेल्या खुबींबद्दल इशांतला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, माही मैदानावर मोकळ्या डोक्याने जातो. परिस्थितीनुसार तो डावपेच आखतो. बॉलिंग मीटिंगमध्येही तो कधीच यायचा नाही. म्हणायचा, हे माझे काम नाही. तुमचं तुम्ही ठरवा. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीइशांत शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App