इंटरकास्ट मॅरिज...! इशान किशनचे आजोबा खंबीर; म्हणाले, 'तेव्हाच वाटले प्रकरण गंभीर...'

Aditi Hundia Ishan Kishan Marriage: इशानच्या आजोबांनी लग्नाच्या मुहूर्ताबाबत मोठा खुलासा केला असून मॉडेल आदिती हुंडियासोबत तो लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:03 IST2026-02-16T15:01:34+5:302026-02-16T15:03:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Aditi Hundia Ishan Kishan: Intercaste marriage...! Ishan Kishan's grandfather is firm; said, 'That's when I felt the matter was serious...' | इंटरकास्ट मॅरिज...! इशान किशनचे आजोबा खंबीर; म्हणाले, 'तेव्हाच वाटले प्रकरण गंभीर...'

इंटरकास्ट मॅरिज...! इशान किशनचे आजोबा खंबीर; म्हणाले, 'तेव्हाच वाटले प्रकरण गंभीर...'

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज इशान किशनने पाकिस्तानी संघाची झोप उडवून दिली आहे. पाकिस्तानातही इशान किशनचे फॅन झाले आहेत. खरे सोने म्हणत आमची टीम भंगार असल्याचे पाकिस्तानी म्हणत आहेत. अशातच इशान किशनची लव्हस्टोरी आणि त्यांची लग्नाची बोलणी चर्चेत येऊ लागली आहे. 

Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले...

इशान किशन याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इशान किशन २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ मध्ये विवाहबंधनात अडकणार असून, त्याच्या घरच्यांनी लग्नाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. खुद्द इशानच्या आजोबांनी, शिवपूजन सिंह यांनी या लग्नाबाबत अधिकृत खुलासा केला आहे. 

लकी चार्म आदिती हुंडियाशी बांधणार लग्नगाठ?
इशान किशनच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात रंगली होती. इशानचे नाव प्रसिद्ध मॉडेल आदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात आहे. आदिती अनेकदा इशानला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. आता २०२७ मध्ये हे दोघे अधिकृतपणे विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. इशानच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने या लग्नाला संमती दिली आहे.

टीव्हीवरील बातम्यांवरून इशानच्या घरच्यांना संकेत मिळत होते. अनेकदा त्यांनी विचारणाही केली होती, परंतू इशानने बोलणे टाळले होते. २०२५ मध्ये आजोबांना इशानने फोन केला होता, तेव्हा तू म्हणशील तिच्याशी लग्न लावून देतो, कोणती मुलगी पाहिली आहेस का असे आजोबांनी विचारले होते. तेव्हा इशानने तुम्ही टीव्हीवर मला आणि आदितीला पाहिले असेलच, तिच्याशीच लग्न करायचे आहे असे इशान म्हणाला होता. 

इशान वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता, तेव्हा त्याच्या वाढदिवसाला आदिती गुपचूप तिकडे गेली होती, तेव्हाच प्रकरण गंभीर असल्याचे आम्हाला वाटले होते. इशानने मुलीचे नाव सांगितले तसेच कुटुंबाच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, असेही म्हणाला होता. कारण ती दुसऱ्या जातीची होती. आम्ही घरात यावर चर्चा केली, कोणीच आक्षेप घेतला नाही, असे आजोबांनी म्हटले आहे. दुसऱ्या जातीची, दुसऱ्या शहरातील यावर आम्हाला हरकत नाही. इशानच्या मोठ्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे, मुलगी चांगली असावी आणि सुखाने रहावेत, हीच आमची अपेक्षा असल्याचे शिवपूजन सिंह हे म्हणाले. इशानचे आजोबा भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्यांच्या गावी नातेवाईकांसोबत याचीच चर्चा करण्यासाठी गेले होते.  दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title : ईशान किशन का अंतरजातीय विवाह स्वीकृत: दादाजी ने खोला राज, जल्द शादी!

Web Summary : ईशान किशन के परिवार ने अदिति हुंडिया से उनके विवाह को मंजूरी दे दी है, भले ही उनकी जाति अलग है। उनके दादाजी ने शादी की योजना का खुलासा किया, जो 2026 या 2027 में होने की उम्मीद है, परिवार की स्वीकृति और दंपति के लिए खुशी पर जोर दिया।

Web Title : Ishan Kishan's Intercaste Marriage Approved: Grandfather Reveals Details, Wedding Soon

Web Summary : Ishan Kishan's family has approved his marriage to Aditi Hundia, despite her different caste. His grandfather revealed wedding plans are underway, expected in 2026 or 2027, emphasizing family's acceptance and happiness for the couple.