Join us  

IPL New franchises for 2022 : अदानी ग्रुप आयपीएलमधील नवा संघ खरेदी करणार; अहमदाबादसाठी बोली लावणार!

IPL New franchises for 2022 : आयपीएल २०२२ मध्ये दहा संघ खेळणार असून ऑक्टोबर महिन्यात या दोन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 3:53 PM

Open in App
ठळक मुद्देहैदराबादच्या ऑरोबिंडो फार्मा लिमिटेड आणि गुजरातचा टोरेंट ग्रुप यांचेही नाव चर्चेत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये दहा संघ खेळणार असून ऑक्टोबर महिन्यात या दोन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन संघांची नावं चर्चेत आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार ऑगस्टपासून नव्या फ्रँचायझींसाठी बोली लावण्यास सुरूवात होईल. अदानी ग्रुपचे गौतम अदानी आणि आर पी संजिव गोएंका ग्रुप यांनी नव्या फ्रँचायझी खरेदीसाठी इंटरेस्ट दाखवला आहे. त्याशिवाय हैदराबादच्या ऑरोबिंडो फार्मा लिमिटेड आणि गुजरातचा टोरेंट ग्रुप यांचेही नाव चर्चेत आहेत.

सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!

बीसीसीआयनं पुढील आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावात नव्या नियमाची घोषणा करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार प्रत्येक फ्रँचायझींना त्यांच्यासंघातील चार खेळाडूंना रिटेन म्हणजेच कायम राखता येईल. या चार खेळाडूंची विभागणी तीन भारतीय व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी अशी केली जाईल. तसेच बीसीसीआयनं प्रत्येक संघाची सॅलरी पर्स ८५ कोटींहून ९० कोटी केली आहे. त्यातील ७५ टक्के रक्कम ही प्रत्येक संघाला लिलावात खर्च करावीच लागेल. पुढील लिलावात ही सॅलरी पर्स अजून वाढवली जाऊ शकते.

कोणता संघ कोणत्या चार खेळाडूंना कायम राखू शकतो हे जाणून घेऊया.. 

  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना/ऋतुराज गायकवाड; जर धोनीनं निवृत्ती घेतली तर रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड व मोईन अली
  • दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ/शिखर धवन
  • कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक
  • मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या/ किरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक
  • पंजाब किंग्स ( Punjab Kings) - लोकेश राहुल, मोहम्मद शमी, ख्रिस गेल, रिली मेरेडीथ
  • राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट
  • रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Bangalore ) - विराट कोहली, मोहम्मद सिराज, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल
  • सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
टॅग्स :आयपीएल २०२१आयपीएल लिलावअदानी