"IPLचे वाढते वर्चस्व वर्ल्ड टी-२० लीगसाठी धोकादायक", ॲडम गिलख्रिस्टचा दावा 

ॲडम गिलख्रिस्टने आयपीएलच्या वाढत्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:54 PM2022-07-27T13:54:29+5:302022-07-27T13:55:53+5:30

whatsapp join usJoin us
 Adam Gilchrist has said that the growing dominance of IPL is a threat to the World T20 League  | "IPLचे वाढते वर्चस्व वर्ल्ड टी-२० लीगसाठी धोकादायक", ॲडम गिलख्रिस्टचा दावा 

"IPLचे वाढते वर्चस्व वर्ल्ड टी-२० लीगसाठी धोकादायक", ॲडम गिलख्रिस्टचा दावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Adam Gilchrist | नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विकेटकिपर फलंदाजांपैकी एक ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) आयपीएलच्या वाढत्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडियन प्रीमियर लीगची (IPL) वाढती मक्तेदारी धोकादायक असल्याचे त्याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर या हंगामात बीग बॅश लीग (BBL) मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच तो यूएईतील टी-२० लीगमध्ये खेळू शकतो याचाच दाखला देत गिलख्रिस्टने आयपीएलच्या वाढत्या वर्चस्वाचा जागतिक क्रिकेटला धोका असल्याचे म्हटले. 

दरम्यान, यूएईत पार पडणाऱ्या टी-२० लीगसाठी आयपीएलमधील फ्रँचायझी मुबंई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स गुंतवणूक करणार आहेत. एकूणच आयपीएलमधील फ्रँचायझी कडून खेळण्यासाठी खेळाडूंचा कल अधिक असल्याने गिलख्रिस्टने संताप व्यक्त केला. यापूर्वी देखील आयपीएलमध्ये खेळाडूंना अधिक मानधन दिले जाते म्हणून ते तिकडे जास्त वळतात असे आरोप करण्यात आले आहेत.

IPL चे वर्चस्व धोकादायक - गिलख्रिस्ट
सेन रेडिओच्या कार्यक्रमामध्ये बोलताना गिलख्रिस्टने सांगितले, "मी डेव्हिड वॉर्नरवर बीबीएलमध्ये खेळण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. मला कल्पना आहे की केवळ वॉर्नरच नाही तर अन्य खेळाडू देखील या मार्गावर जातील. ही आयपीएल फ्रँचायझींची जागतिक स्तरावर वाढत चाललेली क्रेझ आहे, ज्यांच्याकडे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील अनेक संघाचा ताबा आहे."

"ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने यावर विचार करायला हवा, कारण भविष्यात अन्य क्रिकेटर देखील वॉर्नरच्या मार्गावर जाऊ शकतात. जर गिलख्रिस्टने म्हटले की सॉरी ऑस्ट्रेलिया क्रिकेट, मी विविध स्पर्धांमध्ये भारतीय फ्रँचायझीच्या संघासोबत खेळायला जातोय तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकत नाही. कारण हा त्याचा अधिकार आहे," असे गिलख्रिस्टने अधिक म्हटले. ऑस्ट्रेलियाकडून ९६ कसोटी आणि २८७ एकदिवसीय सामने खेळणारा गिलख्रिस्ट डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांसारख्या आयपीएल संघासोबत खेळला आहे. डेक्कन चार्जर्सच्या संघाने २००९ मध्ये गिलख्रिस्टच्या नेतृत्वात आयपीएलचा किताब पटकावला होता. 


 

Web Title:  Adam Gilchrist has said that the growing dominance of IPL is a threat to the World T20 League 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.