युएईतील मैदानात एसीयूचे काम सोपे

अजित सिंग : लक्ष ठेवणे सोयीस्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 04:33 AM2020-07-27T04:33:36+5:302020-07-27T04:33:54+5:30

whatsapp join usJoin us
ACU's work on the field in the UAE is easy | युएईतील मैदानात एसीयूचे काम सोपे

युएईतील मैदानात एसीयूचे काम सोपे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


नवी दिल्ली : ‘आयपीएलचे यंदाचे १३वे पर्व यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. यामुळे क्रिकेटमधील गैरव्यवहारांवर लक्ष ठेवणे आमच्यासाठी थोडे सोयीस्कर ठरेल. कारण ही स्पर्धा येथे केवळ तीन स्टेडियममध्येच खेळविण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे (एसीयू) प्रमुख अजित सिंग यांनी दिली.
२९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान रंगणारी यंदाची आयपीएल दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे खेळविण्यात येईल. अजित यांनी सांगितले की, ‘यूएईमध्ये होणारे आयपीएलचे सामने केवळ तीन स्टेडियममध्येच खेळविण्यात येणार असल्याने एसीयूला आपली कामगिरी करणे सोयीस्कर ठरेल. त्यामुळे आता वेळापत्रक जाहीर झाले की, आम्हाला आमच्या कामगिरीचे अंतिम नियोजन करता येईल.’
सध्या बीसीसीआयमध्ये ८ एसीयू अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांना आयपीएलमधील सर्व सामन्यांसह हॉटेलवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. यावर अजित म्हणाले की, ‘कार्यपद्धतीवर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल. कारण सर्वप्रथम जैव सुरक्षित वातावरण कशाप्रकारे तयार करण्यात आले आहे, हे आधी पाहावे लागेल. जर अतिरिक्त अधिकाऱ्यांची आवश्यकता लागली, तर तशी व्यवस्था आम्ही करू.’
अजित पुढे म्हणाले की, ‘दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्यालय आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास बीसीसीआय आयसीसीकडूनही मदत घेऊ शकते.’ यूएईचा इतिहास सट्टेबाज व मॅच फिक्सर्ससाठी खूप मोठा आहे. मात्र तरी अजित यांना यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वासही आहे.

Web Title: ACU's work on the field in the UAE is easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.