Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...पण असं कधीच होत नाही'; अनुष्काने शेअर केला भावनिक मेसेज

भारत आणि न्यूझीलंडची ट्वेंटी- 20 आणि वन- डे मालिका झाल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 11:01 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघ जवळपास गेल्या एक महिन्यांपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 

भारत आणि न्यूझीलंडची ट्वेंटी- 20 आणि वन- डे मालिका झाल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील न्यूझीलंडमध्ये गेल्या दिवसांपासून होती. मात्र आता अनुष्का भारतात परतली असून तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन एक मेसेज लिहला आहे.

अनुष्काने विराटसोबत फोटो एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत तु विचार करत असेल की वेळेसोबत गुड बाय करणं सोपं असतं पण असं कधीच होत नाही असा भावुक मेसेज अनुष्काने लिहिला आहे.

21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिला कसोटी सामना सुरु होणार असून दोन कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. भारताने ट्वेंटी- 20 च्या मालिकेत 5- 0 अशा फरकाने विजय मिळवला होता. मात्र वन- डे मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3- 0 अशा फरकाने पराभव केला होता. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत