मुंबई : आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटची ABCD शिकलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवताना जे शिकलो ते आयुष्यभर कामी आलं, अशी भावनिक प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिली. रमाकांत आचरेकर सर यांचे बुधवारी निधन झाले. गेले दोन तीन दिवस आचरेकर सरांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचारांनाही उत्तम प्रतिसाद देत होते. पण संध्याकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
आचरेकर सरांच्या निधनाने तेंडुलकर खूप भावूक झाला आहे. तो म्हणाला,''आचरेकर सरांचे माझ्या आयुष्यातील योगदान शब्दात सांगणे अवघड आहे. मी आज तुमच्यासमोर जो काही उभा आहे, त्याचा पाया आचरेकर सरांनी रचला आहे. मागील महिन्यातच मी त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.''
सचिन पुढे म्हणाला,''आचरेकर सरांनी मला खेळायलाही शिकवलं आणि जगायलाही. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे.''