Join us  

सचिन आणि कोहलीपेक्षा धोनी भारतात लोकप्रिय

धोनीकडे आता संघाचे कर्णधारपद नाही. त्याचबरोबर कसोटी संघातूनही त्याने निवृत्ती घेतली आहे. पण त्यानंतरही धोनीची लोकप्रियता कायम नाही तर त्यामध्ये भर पडलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 1:48 PM

Open in App
ठळक मुद्देसर्वेमध्ये धोनीलाच एक खेळाडू म्हणून भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे, हे निदर्शनास आले आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भले चाहते निवृत्ती पत्करण्याचा सल्ला देत असतील, पण तरीही तोच त्यांच्या गळ्यातील ताईत आहे, हे एका सर्वेनुसार पुढे आले आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण, याबाबत एका संकेतस्थळाने सर्वे घेतला होता. या सर्वेमध्ये धोनीलाच एक खेळाडू म्हणून भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे, हे निदर्शनास आले आहे.

या सर्वेमध्ये 40 लाख लोकांची मते घेण्यात आली. यावेळी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू कोण, असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर सर्वाधिक म्हणजेज 7.7 टक्के लोकांनी धोनीलाच पसंती दिली आहे. या सर्वेनुसार धोनीने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या कर्णधार विराट कोहली यांनाही मागे टाकले आहे.

धोनीकडे आता संघाचे कर्णधारपद नाही. त्याचबरोबर कसोटी संघातूनही त्याने निवृत्ती घेतली आहे. पण त्यानंतरही धोनीची लोकप्रियता कायम नाही तर त्यामध्ये भर पडलेली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीसचिन तेंडूलकरविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ