Join us  

Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 3:13 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL), कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) आणि अमेरिकेतील लीगनंतर शाहरूख खानचा मालकी हक्क असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने (  Knight Riders group ) आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक  केली आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती अर्थाय UAE येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये नाईट रायडर्स ग्रुपने फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत आणि अबुधाबी नाईट रायडर्स Abu Dhabi Knight Riders (ADKR)  असे या संघाचे नाव असणार आहे. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २००८मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) रुपाने शाहरूख खानने ट्वेंटी-२० लीगमध्ये एन्ट्री मारली. त्यानंतर २०१५मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सचे ( Trinbago Knight Riders ) हक्क या फ्रँचायझीने मिळवले. नुकतेच नाईट रायडर्स ग्रुपने अमेरिकेत होऊ घातलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये ( MLC) गुंतवणूकीची घोषणा केली आणि Los Angeles Knight Riders नावाने संघ मैदानावर उतरणार आहे. नाईट रायडर्स ग्रुपमध्ये शाहरूखसह  बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला व तिचे पती जय मेहता यांचेही शेअर्स आहेत.   

शाहरुख खान म्हणाला,''मागील काही वर्षांत आम्ही नाईट रायडर्स हा ब्रँड जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि यूएईत ट्वेंटी-२० क्रिकेट लीगच्या माध्यमातून आम्ही येथेही एन्ट्री घेत आहोत. यूएई ट्वेंटी-२० लीगचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याही लीगला  प्रचंड यश मिळेल, यात शंका नाही.'' 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खानसंयुक्त अरब अमिरातीअमेरिकाकॅरेबियन प्रीमिअर लीगआयपीएल २०२२
Open in App