मुंबई - आशिया कप २०२५ मध्ये मिळालेल्या जबरदस्त विजयाचं श्रेय भारताच्या सर्व खेळाडूंना जाते. परंतु या मालिकेत सर्वाधिक चर्चेत राहणारा ओपनर अभिषेक शर्मा याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले. यासाठी आयोजकांकडून अभिषेक शर्मा याला गिफ्ट म्हणून HAVAL H9 ही कार देण्यात आली. मात्र आता ही कार भारतात आणण्यात अनेक अडचणी आहेत. अभिषेक शर्मा ही कार भारतात आणू शकत नाही, त्यामागे कायदेशीर कारणे सांगितली जात आहेत.
HAVAL H9 ही कार लेफ्ट व्हर्जन ड्राइव्हमध्ये आहे. भारतात राइट हँड ड्राईव्ह वाहन चालवण्याची परवानगी आहे. भारतात रोड सेफ्टी आणि वाहन नोंदणी कायद्यानुसार लेफ्ट हँड ड्राईव्ह कार देशात ना नोंदणी होऊ शकतात, ना त्या भारतात चालवता येऊ शकतात. त्यामुळे आशिया कपमध्ये गिफ्ट म्हणून मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात आणू शकत नाही.
अभिषेक शर्माला मिळू शकते कार रिप्लेसमेंट?
माहितीनुसार, HAVAL भारतात नोव्हेंबर २०२५ पर्यंत राईट हँन्ड व्हर्जनमध्ये कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर अभिषेक शर्माला भारतात चालवण्यासाठी हे मॉडेल गिफ्ट केले जाऊ शकते. परंतु कंपनीकडून अद्याप यावर कुठलेही स्पष्टीकरण आले नाही.
काय आहेत HAVAL H9 कारमध्ये फिचर्स?
HAVAL H9 ही कार तिच्या लग्झरी लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. या गाडीत सेफ्टीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. ७ सीटर ले आऊटसह येणाऱ्या या कारमध्ये लेदर सीट्स आणि इलेक्ट्रिक एडेस्टेबल सीट, एप्पल कारप्ले, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरूफसारखे फिचर्स दिले गेलेत. या कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ६ एअरबॅग्स, पार्किंग अस्टिस्ट आणि ABS-EBD सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
काय आहे कारची किंमत?
HAVAL H9 ही कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १ लाख ४२ हजार २०० सौदी रियाल आहेत. भारतीय चलनानुसार त्याची किंमत ३३ लाख ६० हजारांच्या घरात जाते. भारतात या कारची संभाव्य किंमत २५ ते ३० लाख एक्स शोरूम असू शकते. या कारची टक्कर टोयोटो फॉर्च्यूनर यासारख्या लग्झरी कारशी आहे.