फिफ्टीसह अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

स्फोटक अंदाजातील खेळीसह केला विक्रमी धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 23:46 IST2025-01-22T23:45:38+5:302025-01-22T23:46:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Abhishek Sharma scores a big innings with a fifty; equals Yuvraj Singh's record | फिफ्टीसह अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

फिफ्टीसह अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघातील २४ वर्षीय स्टार बॅटर आणि सलामीवीर अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळी साकारली. नियमित संघात स्थान मिळून सातत्यपूर्ण खेळीच्या अभावामुळे इंग्लंड विरुद्धची मालिका त्याच्यासाठी अखेरची संधी असल्याचे बोलले जात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळीसह त्याने संधीचं सोनं करण्यासाठी तयार आहे, याची झलक दाखवली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अभिषेकची स्फोटक खेळी; फिफ्टीसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मानं ३४ चेंडूत धमाकेदार खेळी करताना ७९ धावांची खेळी केली. त्याच्या या स्फोटक अंदाजातील खेळीच्या जोरावर भारतीय संघानं हा सामना १२.५ षटकात ३ गडी राखून जिंकला. अभिषेकनं या दरम्यान अवघ्या २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. या फिफ्टीसह त्याने युवराज सिंगच्या खास विक्रमाशी बरोबरी केलीये.

घरच्या मैदानात सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा खास रेकॉर्ड

अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात आक्रमक अंदाजा बॅटिंग केली. ३४ चेंडूतील ७९ धावांच्या खेळीत त्याने ५ चौकार आणि ८ षटकार ठोकले. या सामन्यात त्याने २० चेंडूत अर्धशतक झळकावत घरच्या मैदानातील संयुक्तरित्या सर्वात जलद तिसरे अर्धशतक ठोकले.

भारतीय संघाकडून घरच्या मैदानात सर्वात जलदग अर्धशतकी खेळीचा रेकॉर्ड

  • सूर्यकुमार यादव - १८ चेंडू  विरुद्ध दक्षिण आफ्रिका (गुवाहटी,  २०२२)
  • गौतम गंभीर - १९ चेंडू विरुद्ध श्रीलंका (नागपूर, २००९)
  • अभिषेक शर्मा - २० चेंडू विरुद्ध इंग्लंड (कोलकाता, २०२५)
  • युवराज सिंग - २० चेंडू विरुद्ध श्रीलंका (मोहाली, २००९)


सलामीसाठीही  भारतीय संघात सध्या तगडी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी  अभिषेक शर्माला मोठी खेळी करणं गरजेचे होतं. विक्रमी डाव साधत त्याने रिस्क झोनमधील आपलं नाव थोडं सेफ केलं आहे. 

Web Title: Abhishek Sharma scores a big innings with a fifty; equals Yuvraj Singh's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.