Abhishek Sharma Record: आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील लढतीची चर्चा यावेळी वेगळ्या कारणामुळे रंगतीये. बहुतांश भारतीयांनी पाक विरुद्ध खेळण्याला विरोध केल्यावरही टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यासाठी दुबईच्या मैदानात उतरली. फक्त मॅच खेळणार दोस्ती नाही दाखवणार, असा पवित्रा घेत टीम इंडियाने पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं. भारतीय संघाच्या दिमाखदार विजयानंतर हा मुद्दा चर्चेत आला. इथं आपण एक नजर टाकुयात अभिषेक शर्मानं पाकिस्तानविरुद्ध फक्त १३ चेंडूत सेट केलेल्या खास विक्रमांवर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुरु युवीसह किंग कोहलीचा विक्रम मोडला
पाकिस्तानच्या संघानं ठेवलेल्या १२८ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं संघाला स्फोटक अंदाजात सुरुवात करून दिली. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार अन् दुसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारत त्याने शाहीन शाह आफ्रिदीचं स्वागत केलं. तो फक्त १३ चेंडू खेळला पण ३१ धावांच्या खेळीत अनेक विक्रम करून परतला. या खेळीत त्याने गुरु युवराज सिंग आणि रन मिशन विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.
IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड
२०० प्लसच्या स्ट्राइक रेटसह सेट केला नवा विक्रम
अभिषेक शर्मानं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २३८ च्या स्ट्राइक रेटसह धावा कुटल्या. याआधी २०१२ मध्ये युवराज सिंगनं पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या होत्या. आता पाक विरुद्ध भारताकडून सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा करण्याचा विक्रम हा अभिषेक शर्माच्या नावे झाला आहे.
IND v PAK T20I सामन्यात कमीत कमी ३० धावा करताना सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा कुटणारे फलंदाज
- अभिषेक शर्मा – २३८.४६
- इमरान नझीर – २३५.७१
- मोहम्मद हाफीज – २११.५३
- मोहम्मद नवाझ – २१०.००
- शाहीन शाह आफ्रिदी – २०६.२५
कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
भारतीय संघाकडून एका कॅलेंडर ईयरमध्ये टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मानं शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. धवनने २०१८ मध्ये १७ डावात २५ षटकार मारले होते. अभिषेक शर्मानं ५ डावात २५ षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. एका षटकारासह तो या यादीत टॉपला पोहचेल.
एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
- शिखर धवन - १७ डावात २५ षटकार (२०१८)
- अभिषेक शर्मा- ५ डावात २५ षटकार (२०२५)
- यशस्वी जैस्वाल - १४ डावात २२ षटकार (२०२३)
- तिलक वर्मा - ५ डावात २१ षटकार (२०२४)
कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला
पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम याआधी विराट कोहलीच्या नावे होता. २०२२ मध्ये दुबईच्या मैदानात कोहलीनं पाकविरुद्ध २९ धावा कुटल्या होत्या. अभिषेक शर्मानं ३१ धावांसह किंग कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
Web Title: Abhishek Sharma Record T20I Highest Strike Rate In IND vs pak t20I Match Asia Cup 2025 Yuvraj Singh Virat Kohli Record Broken
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.