Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजूच्या मदतीला धावला अन् फसला! अभिषेक शर्मावर ओढावली किंग कोहलीसारखी नामुष्की

अभिषेक शर्मानं केली किंग कोहलीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:46 IST

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी, २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता तंबूत परतला. एकाच मालिकेत दुसऱ्यांदा अभिषेक शर्मावर ही अशी नामुष्की ओढावली. यासह त्याने विराट कोहलीच्या नकोशा विक्रमाचीही बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजूच्या मदतीला धावला अन् अभिषेकवर ओढावली ही नामुष्की

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन हा प्रत्येक सामन्यात अपयशी ठरताना दिसला. पहिल्या तीन सामन्यात अभिषेक शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात करताना तो स्ट्राइकवर दिसला. पण चौथ्या अभिषेक शर्मानं त्याच्याऐवजी पहिला चेंडूचा सामना करण्याचा निर्णय घेतला. तो संजूच्या मदतीला धावला अन् स्वत: फसला असे काहीसे चित्र या  सामन्यात पाहायला मिळाले. संजू सॅमसन याने आतापर्यंत २१ वेळा भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली आहे. यात १८ वेळा त्याने स्ट्राइक घेतले आहे. पण सातत्यपूर्ण अपयश पदरी पडत असताना त्याने नॉन स्ट्राइकला थांबण्याला पसंती दिली. या प्रयोगात अभिषेक शर्मावर गोल्डन डकची  नामुष्की ओढावली. दुसरीकडे संजूही स्वस्तात माघारी फिरला. 

IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर...

अभिषेक शर्मानं केली किंग कोहलीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी भारताकडून सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा आणि विराट कोहलीसह ११ प्रत्येकी दोन वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.  या यादीत टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. संजू सॅमसन संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा हे प्रत्येकी ३-३ वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाले आहेत. रोहित शर्मावर तब्बल पाचवेळा ही नामुष्की ओढावली आहे.

T20I मध्ये सर्वाधिक वेळा 'गोल्डन डक' होणारे भारतीय फलंदाज

  • ५ – रोहित शर्मा
  • ३ – संजू सॅमसन
  • ३ – तिलक वर्मा
  • ३ – श्रेयस अय्यर
  • ३ – वॉशिंग्टन सुंदर
  • २ – अभिषेक शर्मा*
  • २ – अर्शदीप सिंग
  • २ – जसप्रीत बुमराह
  • २ – रविंद्र जडेजा
  • २ – दिनेश कार्तिक
  • २ – विराट कोहली
  • २ – कुलदीप यादव
  • २ – रिषभ पंत
  • २ – केएल राहुल
  • २ – रवी बिश्नोई
  • २ – सूर्यकुमार यादव

दोन वेळा 'गोल्डन डक'ची नामुष्की तरी अभिषेक शर्मानं साधला हा डाव

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन वेळा गोल्डन डकवर बाद होऊनही अभिषेक शर्मा या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत  १५२ धावांसह आघाडीच्या तीन फलंदाजांपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत दोन अर्धशतकासह १७९ धावांसह अव्वलस्थानी असून ग्लेन फिलिप्सनं १६९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma's good deed backfires, joins Kohli in unwanted record.

Web Summary : Abhishek Sharma's attempt to help Sanju Samson led to a golden duck, equaling an unwanted record with Virat Kohli. Despite this, he remains a top scorer in the series, showcasing resilience after early dismissals. Rohit Sharma leads in most golden ducks for India.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअभिषेक शर्मासंजू सॅमसनविराट कोहली