Abhishek Sharma Create History In SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाकडून मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्मानं बंगाल संघाविरुद्ध वादळी शतक झळकावले. हैदराबादच्या जिमखाना ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात अभिषेकनं ५२ चेंडूत ८ चौकार आणि १६ उत्तुंग षटकाराच्या जोरार १४८ धावांची खेळी साकारली. त्याने २८४.६२ च्या स्ट्राइक रेटसह केलेल्या धावांच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३१० धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मानं गुरु युवीच्या विक्रमाशी केली बरोबरी
या सामन्यात अभिषेक शर्मानं अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकाव गुरु युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवीनं अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम हा आशुतोष शर्माच्या नावे आहे. त्याने ११ चेंडूत हा पराक्रम नोंदवला होता.
विराटने कसोटी निवृत्ती मागे घेण्याची होतेय मागणी; ...तर ठरेल '21व्या शतकातील' सर्वात मोठा कमबॅक!
फक्त विराट कोहली पुढेअभिषेक शर्मानं या सामन्यात भारताकडून ठोकलेली ही दुसरी सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. एवढेच नाही तर सलामीवीराच्या रुपात त्याच्या भात्यातून आललेले हे तिसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. टी-२० कारकिर्दीतील ८ व्या अर्धशतकासह अभिषेक शर्मानं रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली असून छो़ट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत फक्त विराट कोहली त्याच्या पुढे आहे. कोहलीनं टी-२० मध्ये ९ अर्धशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
एका वर्षात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
अभिषेक शर्मानं बंगाल विरुद्धच्या सामन्यात १६ षटकार मारले. यासह टी-२० मध्ये यंदाच्या वर्षात एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रमही त्याच्या नावे झाला आहे. आतापर्यंत त्याच्या भात्यातून ९१ षटकार पाहायला मिळाले आहेत. गतवर्षी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ८७ षटकार मारल्याचा रेकॉर्ड होता.
Web Summary : Abhishek Sharma smashed a blistering century in the SMAT 2025, equalling Yuvraj Singh's record. Playing for Punjab, he scored 148 runs off 52 balls against Bengal, hitting 16 sixes. His explosive innings helped Punjab reach 310/5. Sharma also matched Yuvraj's fastest fifty record, achieving it in just 12 balls.
Web Summary : अभिषेक शर्मा ने SMAT 2025 में तूफानी शतक जड़ा, युवराज सिंह के रिकॉर्ड की बराबरी की। पंजाब के लिए खेलते हुए, उन्होंने बंगाल के खिलाफ 52 गेंदों में 148 रन बनाए, जिसमें 16 छक्के शामिल थे। उनकी विस्फोटक पारी से पंजाब 310/5 तक पहुंचा। शर्मा ने युवराज के सबसे तेज अर्धशतक के रिकॉर्ड की भी बराबरी की, जिसे उन्होंने सिर्फ 12 गेंदों में हासिल किया।