Abhishek Sharma Becomes First Indian Batsman To Score A Hattrick Of Ducks In T20 World Cup अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत- नेदरलँड यांच्यात साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा या सामन्यात दमदार कमबॅक करेल, अशी आस होती. पण तो पुन्हा अपयशी ठरला. विशेष म्हणजे या सामन्यातही त्याला खाते उघडता आले नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सिराजची जर्सी घालून मैदानात उतरला, पण...
पहिल्या दोन सामन्यात शून्यावर माघारी फिरण्याची वेळ आलेला अभिषेक शर्मा नेदरलँडस विरुद्धच्या सामन्यात चक्क सिराजची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली धाव मॅजिक दाखवायचं सोडा खातं उघडण्याचं त्याचं स्वप्न तिसऱ्या सामन्यातही अधुरेच राहिले. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात चौथ्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात आर्यन दत्तने त्याला शून्यावर माघारी धाडले.
VIDEO: पाकिस्तानी कोच-कॅप्टनमध्ये तुफान राडा; हेसनने रागात सुनावलं, सलमानने बाटलीच फेकली...
संघासह बॉलर बदलला, पण अभिषेकचा फॉर्म नाही दिसला
भारतीय संघाने मुंबतील वानखेडेच्या मैदानात अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. यंदाच्या हंगामात अभिषेक शर्माचा धमाका पाहायला मिळेल, अशी आशा होती. पण USA विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या पदरी भोपळा पडला. या सामन्यात त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली होती. तब्येत ठीक नसल्यामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो मुकला. पाकिस्तानविरुद्ध कमबॅक करताना पाच चेंडू खेळून तो पुन्हा शून्यावर बाद झाला. नेंदरलँड्सविरुद्ध तिसऱ्या चेंडूवर पुन्हा त्याच्या पदरी भोपला पडला. तीन सामन्यात तो फक्त नऊ चेंडू खेळला आहे.